साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या बॉडीगार्डचं कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, अभिनेत्याला मागावी लागली माफी

South Superstar Nagarjuna | 'खोटे बोलतोस काय झालंय तुला माहिती आहे...', नागार्जुनच्या बॉडीगार्डचं कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, सगळ निघून गेलेल्या अभिनेत्याला पाहून नेटकऱ्यांचा संताप... सध्या घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या बॉडीगार्डचं कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, अभिनेत्याला मागावी लागली माफी
| Updated on: Jun 24, 2024 | 1:18 PM

साऊथ सुपरस्टार नागार्जुन याचा दबदबा जगभरात पाहायला मिळतो. नागार्जुन याच्या चाहत्यांची संख्या भारतात नाहीतर, सातासमुद्रा पार देखील आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं आहे. विमानतळातून बाहेर येताच नागार्जुन याच्या भोवती चाहत्यांची गर्दी जमली. सध्या ज्या घटनेची चर्चा रंगली आहे, ती घटना मुंबई विमानतळ येथील आहे. नागार्जुन याला पाहिल्यानंतर विमानतळावरील एका कर्माचाऱ्याने नागार्जुन याला भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्याच्या बॉडीगार्डने कर्मचाऱ्यासोबत केलेला गैरव्यवहार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी नागार्जुन याच्या बॉडीगार्डला ट्रोल केलं आहे. व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर खुद्द नागार्जुन याने एक्सवर माफी मागितली आहे. पण नेटकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर स्पष्ट दिसत आहे.

 

व्हिडीओमध्ये नागार्जुन याला पाहाताच चाहता धावत येतो. अभिनेत्याला स्पर्श करतो, पण स्वत:च्या मार्गावर चालणारा नागार्जुन दुसऱ्या दिशेकडे पाहत असतो आणि त्या व्यक्तीकडे लक्ष देत नाही. यानंतर, व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, नागार्जुनच्या बॉडीगार्डने त्या व्यक्तीला पाहताच त्याला मागे ढकललं.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सिनेमाची पूजा आता थांबली पाहिजे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर्वांचा आदर करता आला पाहिजे…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अभिनेत्याने त्या व्यक्तीला पाहिलं नाही. अशात तो चुकीचा कसा असू शकतो. तरी देखील त्याने माफी मागितली…’, ‘सर्व चुकी त्या बॉडीगार्डची आहे…’ असं देखील नेटकरी म्हणत आहेत.

नागार्जुन याने मागितली माफी…

साऊथ सुपरस्टारला याची माहिती मिळताच त्याने यावर प्रतिक्रिया दिली. शिवाय अभिनेत्याने बॉडीगार्डच्या वतीने सर्वांची माफी मागितली. व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘नुकताच मला याबद्दल माहिती मिळाली. जे झालं ते योग्य नव्हतं आणि असं व्हायला देखील नक… मी त्या व्यक्तीची माफी मागतो. पुन्हा असं होणार नाही, याची काळजी देखील मी घेईल..’ असं देखील अभिनेता म्हणाला.