Nana Patekar : नाना पाटेकर यांच्यासाठी दोन अभिनेत्रींमध्ये कॅटफाईट झालेली तेव्हा… त्यांना महिलेसोबत रंगेहात पकडलं अन्

Happy Birthday Nana Patekar : एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर त्यांच्या लव्हलाईमुळे चर्चेत आले होते... एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडल्यानंतर नाना पाटेकर यांचं 20 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं...

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्यासाठी दोन अभिनेत्रींमध्ये कॅटफाईट झालेली तेव्हा... त्यांना महिलेसोबत रंगेहात पकडलं अन्
अभिनेते नाना पाटेकर
| Updated on: Jan 01, 2026 | 2:53 PM

Happy Birthday Nana Patekar : दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अनेक सिनेममांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे. म्हणून त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. आज नाना पाटेकर पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसतात. पण आजही ते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर त्यांच्या लव्हलाईमुळे चर्चेत आले होते… एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडल्यानंतर नाना पाटेकर यांचं 20 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं… आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा नाना पाटेकर विवाहित होते आणि वडील देखील होते…

सांगायचं झालं तर, नाना पाटेकर आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोइराला (Manisha Koirala) हिच्यासोबत देखील त्यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये स्क्रिन देखील एकत्र शेअर केलेली… ज्यामुळे ओळख वाढली आणि दोघांमध्ये प्रेम बहरुन आलं… पण दोघांमध्ये 20 वर्षांचं अंतर होतं… मनिषा ही नाना पाटेकर यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचं मनिषी कोईराला हिच्या घरी येणं – जातं देखील मोठ्या प्रमाणात वाढलं होतं… पण सगंळ काही चांगलं सुरु असताना असं काय झालं, ज्यामुळे नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांचं नातं एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे मोडलं…

रिपोर्टनुसार, नीषा कोईरालाने नाना पाटेकर यांना अभिनेत्री आयशा झुल्कासोबत रंगेहाथ पकडलं होतं. या घटनेनंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचे सांगितलं जातं. एका मुलाखतीत नाना यांनी ब्रेकअपद्दल दुःख देखील व्यक्त केलं होतं… तिला पाहिल्यानंतर आजही डोळ्यात पाणी येतं… असं देखील नाना म्हणालेले.

मनिषा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 5 – 6 नाही तर, मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 12 जणांना डेट केलं होतं. पण कोत्याच सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने नेपाळ येथील उद्योजक सम्राट दलाल याच्यासोबत लग्न केलं. पण उद्योजकासोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.