Nana Patekar : झेब्रा क्रॉसिंगचे 15 रुपये, 13 व्या वर्षी नोकरी, गरिबीचे दिवस आठवत नाना पाटेकर म्हणालेले, ‘दोन वेळच्या जेवणासाठी…’
Nana Patekar : गाडी रंगवायचे 150 रुपये तर, झेब्रा क्रॉसिंगचे 15 रुपये... 13 व्या वर्षी नोकरी, पण पगार..., गरिबीचे दिवस आठवत नाना पाटेकर म्हणालेले, 'दोन वेळच्या जेवणासाठी...', आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत, पण त्यांनी जगण्याचा खरा अर्थ लोकांना सांगितला...

Nana Patekar : ‘माझा मुलगा मल्हारला सांगितलं आहे, तुला हवं तेवढं ठेव आणि बाकीचं दान कर… काय करायचा आहे एवढा पैसा…’, असं वक्तव्य दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेकांना जगण्याचा खरा अर्थ शिकवला… आपल्या गरजा कमी असल्या की, आयुष्य सोपं जातं, असं देखील नाना पाटेकर म्हणालेले. तर एका कार्यकर्मात नाना पाटेकर यांनी गरिबीच्या दिवसांबद्दल देखील सांगितलं होतं. गाडी रंगवायचे 150 रुपये तर, झेब्रा क्रॉसिंगचे 150 रुपये… 13 व्या वर्षी नोकरी लागल्यानंतर पगारात काय काय यायचं याबद्दल देखील नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं..
गरिबीचे दिवस आठवत नाना पाटेकर म्हणालेले, ‘गरीब मुलं आम्ही सगळी. लोकसत्ताची गाडी असायची, ती आम्ही रंगवायचो त्याचे 150 रुपये मिळायचे. एका बाजूला लोकसत्ता आणि दुसऱ्या बाजूला Indian Express असं लिहायचं. रस्त्यावरतं झेब्रा क्रॉसिंगचे 15 रुपये मिळायचे. दोन वेळच्या जेवणाची इतकी भांत होती, त्यामुळे बाकीच्या कोणत्या गोष्टींमध्ये अडकण्यासाठी वेळच नव्हता. 13 वर्षांचा असताना नोकरी लागली, तिकडे एक वेळचं जेवण आणि 35 रुपये महिन्याला मिळायचे. त्या 35 रुपयांमध्ये घरातलं सामान भरुन व्हायचं. ही 1963 सालची गोष्ट आहे…’
पुढे नाना पाटेकर यांनी कॉफीचा देखील किस्सा सांगितला, ‘कॉफी प्यायची असेल तर, आम्ही 15 दिवस आधी ठरवायचो… 15 दिवसांनंतर कॉफी प्यायची आहे नेस कॅफे… मग त्यासाठी पैसे जमा करायचे, ती कॉफी पिण्याआधी ती पाहण्यातच वेळ निघून जायचा… तसे दिवस पाहिल्यानंतर आज काही वाटत नाही. कोणत्या तडजोडी कराव्या लागत नाहीत.. गरजा सिमित ठेवल्यानंतर आयु्ष्य सोपं जातं… ‘, असं नाना पाटेकर म्हणालेले.
नाना पाटेकर यांचं निधन…
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी निधन झालं आणि त्याच रात्री पुण्यातील त्यांच्या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा मल्हार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री नाना पाटेकर यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झालेला. अखेर डॉक्टरांनी नाना पाटेकरांनी मृत घोषित केलं.