Nana Patekar: नाना पाटेकरांनी मध्यरात्री कोणाला केला होता शेवटचा मेसेज? मित्राचं नाव समोर, गोव्यात त्या रात्री नेमकं काय घडलं?
Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांनी मध्यरात्री मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचं कळवलं होतं. तो मित्र कोण होता आणि मध्यरात्री नेमकं काय घडलं, याबाबतची माहिती समोर आली आहे.

Nana Patekar last message: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नानांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. मात्र, निधनापूर्वी मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास त्यांनी एका जवळच्या मित्राला मेसेज केला होता. खुद्द डॉक्टरांनीही याबद्दलची माहिती दिली होती. या मेसेजमध्ये नानांनी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं कळवलं होतं. आता नानांच्या या मित्राचं नाव आणि त्या रात्री घडलेल्या घटनांचा तपशील समोर आला आहे.
मध्यरात्री केला होता मित्राला मेसेज
मिळालेल्या वृत्तानुसार, नाना पाटेकर गोव्यातील डोना पावला परिसरातील आपल्या निवासस्थानी होते. मध्यरात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांनी रात्री साधारण 2.30 वाजता त्यांच्या मित्राला मेसेज करून तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, रात्री उशिराची वेळ असल्याने मित्राच्या नजरेस हा मेसेज तातडीने पडला नाही. नानांच्या या मित्राचं नाव अमेय नाईक असल्याचं सांगितलं जात आहे. ते नानांचे जवळचे मित्र आणि फॅमिली फ्रेंड असल्याची माहिती समोर आली आहे. मेसेज पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने नानांच्या घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती.
मित्र घरी पोहोचला तेव्हा नानांची प्रकृती गंभीर
नानांच्या प्रकृतीबाबत मणिपाल रुग्णालयातील डॉक्टर डॉ. शेखर साळकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नानांचा मित्र त्यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. त्यावेळी नानांना प्रचंड घाम फुटला होता आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं दिसून आलं. यानंतर केअरटेकरच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने नानांना तातडीने उपचार देण्यास सुरुवात केली. त्यांना सीपीआरही देण्यात आला. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबतही माहिती समोर आली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. नानांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.