AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharichi Vari : मुहूर्ताच्या दिवशीच हिरोचा मृत्यू, 70 टक्के शूटिंग झाल्यावर अभिनेत्रीचा भीषण अपघात; गाजलेल्या मराठी सिनेमाची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

Marathi Movie : दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा 'पंढरीची वारी' हा चित्रपट आजही आवर्जून पाहिला जातो. पण, या सिनेमाच्या मागे दोन दुर्घटना आहेत. त्यातूनही न डगमगता निर्मात्यांनी सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला.

Pandharichi Vari : मुहूर्ताच्या दिवशीच हिरोचा मृत्यू, 70 टक्के शूटिंग झाल्यावर अभिनेत्रीचा भीषण अपघात; गाजलेल्या मराठी सिनेमाची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी
| Updated on: Nov 25, 2026 | 5:41 PM
Share

1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पंढरीची वारी‘ या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आजही आषाढी एकादशीच्या दिवशी हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो. मात्र, प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेक संकटांचा सामना करणारी एक वेदनादायी कहाणी दडली आहे. चित्रपटाचे निर्माते अण्णासाहेब घाटगे यांना या सिनेमासाठी मोठा आर्थिक फटका बसला. मुहूर्ताच्या दिवशीच प्रमुख अभिनेत्याच्या निधनाची बातमी आली, तर चित्रपटाचं ७० टक्के चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला. या सगळ्या संकटांवर मात करत त्यांनी अखेर हा चित्रपट पूर्ण केला.

मुहूर्ताच्या दिवशीच आली अरुण सरनाईक यांच्या निधनाची बातमी

21 जून 1984 रोजी आळंदी येथे चित्रपटाचा मुहूर्त ठरला होता. दिग्दर्शनाची जबाबदारी रमाकांत कवठेकर यांच्याकडे होती. आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीचं चित्रीकरण दोन कॅमेऱ्यांच्या मदतीने अवघ्या 25 दिवसांत पूर्ण करण्याचं नियोजन होतं.

सगळ्या कलाकारांची आणि तंत्रज्ञांची तयारी झाली होती. मात्र, टीम ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांची वाट पाहत होती. त्याचवेळी अण्णासाहेब घाटगे यांच्यासाठी हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन आला. फोनवर बोलल्यानंतर त्यांच्या हातातील रिसीव्हर खाली पडला आणि ते जागेवरच बसले. कारण फोनवर अरुण सरनाईक यांच्या अपघाती निधनाची बातमी देण्यात आली होती. या बातमीनं संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला.

70 टक्के शूटिंग पूर्ण झालं, पण अभिनेत्रीचा भीषण अपघात

अरुण सरनाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कोणाला घ्यायचं, हा मोठा प्रश्न निर्मात्यांसमोर होता. अखेर ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर रंजना देशमुख आणि श्रीकांत मोघे यांना घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. आळंदी ते पंढरपूर वारीचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत जवळपास 70 टक्के चित्रपट तयार झाला होता. मात्र, चित्रपटाचं शेवटचं दहा दिवसांचं चित्रीकरण बाकी असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना घडली. दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना अभिनेत्री रंजना यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि त्यांना चालणंही कठीण झालं.

रंजना बऱ्या होतील म्हणून निर्मात्यांनी तीन वर्षे पाहिली वाट

रंजना पुन्हा बऱ्या होतील आणि चित्रपटाचं उर्वरित चित्रीकरण पूर्ण करता येईल, या आशेनं अण्णासाहेब घाटगे यांनी जवळपास तीन वर्षे वाट पाहिली. मात्र, रंजना पुन्हा पूर्वीसारख्या काम करू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. अखेर त्यांनीच निर्मात्यांना दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊन चित्रपट पूर्ण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रंजना यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची निवड करण्यात आली. तर श्रीकांत मोघे यांच्या जागी बाळ धुरी यांना घेण्यात आलं. आधीच 70 टक्के पूर्ण झालेल्या चित्रपटाचं पुन्हा चित्रीकरण करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

चित्रपटासाठी खर्च केले 18 लाख रुपये

‘पंढरीची वारी’ हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब घाटगे यांनी आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावली होती. त्या काळात या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास 18 लाख रुपये खर्च झाले होते. अरुण सरनाईक यांचं निधन, रंजना यांचा अपघात, कलाकारांमधील बदल आणि पुन्हा करावं लागलेलं चित्रीकरण अशा अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला.

अनेकांनी त्यांना हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विठ्ठलावरची श्रद्धा आणि चित्रपट पूर्ण करण्याची जिद्द यामुळे अण्णासाहेब घाटगे यांनी माघार घेतली नाही. अखेर 8 डिसेंबर 1988 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनेक संकटांवर मात करून तयार झालेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. जयश्री गडकर, बाळ धुरी, नंदिनी जोग, राजा गोसावी, अशोक सराफ आणि राघवेंद्र कडकोळ यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली.

Follow Us
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!