नाना पाटेकरांचा असा सिनेमा, जो पाहताना आजही उडतो अनेकांचा थरकाप, अनेकजण टीव्हीच बंद करतात
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी नरसिंहची भूमिका साकारली होती. हा सिनेमा पाहताना अनेकांचा भितीने थरकाप उडायचा.

बॉलिवूडमध्ये अनेक असे चित्रपट आहेत, ज्यांची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवतो. काही चित्रपटांमधील प्रसंग इतके अंगावर येणारे असतात की, ते पाहताना प्रेक्षकही अस्वस्थ होतात. नाना पाटेकर यांचाही असाच एक चित्रपट आहे, ज्यामध्ये त्यांचा खतरनाक अंदाज पाहायला मिळाला होता. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. विशेष म्हणजे, मोठ्या कलाकारांची फौज असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.
नाना पाटेकरांचा अंगावर येणारा अंदाज
नाना पाटेकरांची मुख्य ओळख होती ती म्हणजे त्यांचा दमदार अभिनय. गंभीर भूमिका असो किंवा एखाद्या व्यक्तिरेखेतील राग आणि क्रूरपणा, नाना आपल्या अभिनयातून पात्र जिवंत करायचे. ‘शक्ती : द पॉवर’ या चित्रपटातही त्यांचा असाच प्रभावी अंदाज पाहायला मिळाला होता. या चित्रपटात त्यांनी नरसिंह ही भूमिका साकारली होती. त्यांची व्यक्तिरेखा अत्यंत कठोर स्वभावाची असून, चित्रपटातील संघर्षाला ती महत्त्वाचे वळण देते.
करिश्मा कपूरच्या आयुष्यातील संघर्षाची कथा
या चित्रपटात करिश्मा कपूरने नंदिनीची भूमिका साकारली होती. आपल्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आईची ही कथा आहे. पतीसोबत कॅनडामध्ये राहणाऱ्या नंदिनीच्या आयुष्यात भारतात आल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. मुलाच्या भवितव्यासाठी तिला कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो. नाना पाटेकर आणि करिश्मा कपूर यांच्या व्यक्तिरेखांमधील संघर्ष हा चित्रपटाचा महत्त्वाचा गाभा आहे.
शाहरुख खानचीही होती भूमिका
या चित्रपटात शाहरुख खानने जयसिंगची भूमिका साकारली होती. त्याची भूमिका मर्यादित असली, तरी नाना पाटेकर, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यासोबत तो या चित्रपटात दिसला होता. कृष्णा वामसी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.
मोठी स्टारकास्ट, पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप
नाना पाटेकर, शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांसारखे लोकप्रिय कलाकार असूनही ‘शक्ती : द पॉवर’ला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि त्यातील संघर्षाची कथा यामुळे हा चित्रपट वेगळा ठरला. नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील या चित्रपटाची चर्चा आजही केली जाते. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी लिहिलं की, ‘नानांचा जीवंत अभिनय पाहून अंगाचा थरकाप उडतो’. तर दुसऱ्या एकाने लिहिलं, ‘आम्ही हा सिनेमा लागला की चॅनेल बदलावा लागतो’.
