
जसे चित्रपटांमध्ये कधीकधी आपल्याला आनंदी शेवट असलेली प्रेमकथा पाहायला मिळते तर कधीकधी दुःखद शेवट. असे काही सेलिब्रिटी आहेत. ज्यांचे लव्ह लाईफ एकतर सर्वांसमोर आदर्श ठरलं तर कोणासाठी शाप ठरलं.पण एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या च्या लव्हलाईफची चर्चा सर्वात जास्त झाली. कारण या अभिनेत्रीने लग्न करताच आपलं अख्ख आयुष्य एका विधेवे सारखंच जगलं आहे. बॉलिवूडची सर्वाच लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक.
अभिनेत्री दिग्दर्शकाच्या अपघातानंतर चक्क विधेवेसारखं आयुष्य जगू लागली
दिग्दर्शकाच्या प्रेमात अखंड बुडालेली अभिनेत्री दिग्दर्शकाच्या अपघातानंतर चक्क विधेवेसारखं आयुष्य जगू लागली. ही अभिनेत्री म्हणजे नंदा. ज्यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक हिट चित्रपट दिले. नंदा यांनी 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंदा केवळ सुंदरच नव्हत्या तर त्यांचा स्वभाव इतका चांगला होता की दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानूने तिला आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं.
एकापेक्षा एक चित्रपट दिले
नंदा 7 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर, अभिनेत्रीने तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिथे ती पुन्हा मुख्य अभिनेत्री म्हणून काम करू लागली. नंदा यांनी तिच्या करिअरमध्ये भाभी, छोटी बहन, कानून, हम दोनो, आशिक, जब जब फेल खिले, इत्तेफाक, द ट्रेन, प्रेम रोग यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शशी कपूर यांच्यासोबत तिचा ‘जब जब फूल खिले’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. तसेच त्या चित्रपटातील गाणेही तेवढेच हीट आहेत.
दिग्दर्शकाच्या अपघातानंतर अभिनेत्री थेट विधवेसारखं आयुष्य जगू लागली
तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर, नंदा सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. पण नंदाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. नंदा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मनमोहन देसाई यांच्या प्रेमात पडली ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मनमोहन यांच्या पत्नीचे 1979 मध्ये निधन झालं आणि त्यांनी 90 च्या दशकात नंदा यांना प्रपोज केलं. पण दोन वर्षांनंतर 1992 मध्ये मनमोहन यांचा अपघात झाला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
त्या फक्त पांढरे कपडे घालायच्या
मनमोहन यांच्या मृत्यूनंतर नंदा नंतर इतक्या दुःखी झाल्या की त्यांनी यानंतर कधीही लग्न केलं नाही. एवढेच नाही तर त्यानंतर त्यांनी रंगीबेरंगी कपडे घालणेही बंद केले आणि विधवेसारखे जीवन जगू लागली. असेही वृत्त आहे की नंदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसल्या नाहीत. त्या फक्त पांढरे कपडे घालायच्या. त्यांनी त्यांचे हिऱ्यांचे दागिनेही दान केले होते. त्यांचा भाऊ जयप्रकाश यांच्या मते, नंदा एका विधवेसारखं राहू लागली होती.