
आज 23 सप्टेंबर रोजी देशाची राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आजचा हा 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे. दरम्यान आज शाहरूख खानसह अनेक कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी, लघुपटांसाठी तसेच इतर अनेक श्रेणींसाठी पुरस्कार दिले गेले.
5 बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
पण कौतुकाची गोष्ट म्हणजे आजच्या सोहळ्यात 5 बालकलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात केवळ मोठे कलाकारच नाही तर हे बालकलाकारही चमकले. यात मराठी चित्रपटातील बालकलाकारांची नावे देखील आहेत. कोणत्या बाल कलाकाराला कोणत्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते जाणून घेऊयात.
मराठी चित्रपटांसाठी हे बालकलाकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
“नाळ 2” या मराठी चित्रपटासाठी त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे श्रीनिवास पोकळेला दुसऱ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. कबीर खंदारेला “जिप्सी” या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सुकृती वेणी बंद्रेड्डीला “गांधी तथा चेट्टू” या तेलगू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार देण्यात आला. मोठ्या कलाकारांप्रमाणेच या बालकलाकार मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ऑगस्टमध्ये विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती
1 ऑगस्ट रोजी 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. शाहरुख खानला “जवान” चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, जो त्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता होता. तर, विक्रांत मेस्सीला “12 thफेल” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. दरम्यान, मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे – राणी मुखर्जी
सर्वोत्कृष्ट अभिनेता: जवान – शाहरुख खान, 12th फेल-विक्रांत मेस्सी
सर्वोत्तम दिग्दर्शन: द केरळ स्टोरी – सुदीप्तो सेन
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म: 12th फेल
सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फिल्म जो प्रोव्हिडिंग कम्प्लीट एंटरटेनमेंट: रॉकी और रानी की प्रेम कहानी
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म जो प्रोड्युस करते राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्ये: सॅम बहादूर
सर्वोत्कृष्ट पटकथा: बेबी (तेलगू) – साई राजेश नीलम पार्किंग (तमिळ) – रामकुमार बालकृष्णन
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: सिर्फ एक बंदा काफी है – दीपक किंगराणी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: द केरळ स्टोरी
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: कथाल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री
सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म ऑफ अ डायरेक्टर: आत्मपॅम्फ्लेट – आशिष बेंडे
सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन फिल्म: नाळ 2
सर्वोत्कृष्ट फिल्म इन एव्हीजीसी: हनुमान-मॅन
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्शन: हनुमान-मॅन (तेलगू) -स्टंट कोरियोग्राफी – नंदू आणि पृथ्वी
सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी: धिंडोरा बाजे रे! – रॉकी और रानी की प्रेम कहानी – वैभवी मर्चंट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (पार्श्वभूमी स्कोअर): प्राणी – हर्षवर्धन रामेश्वर
सर्वोत्कृष्ट मेकअप: सॅम बहादूर – श्रीकांत देसाई
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन: सॅम बहादुर – सचिन लोवलेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर
सर्वोत्कृष्ट डिझाईन – सर्वोत्कृष्ट डिझाईन – हे सर्वोत्कृष्ट
डिझाईन – सर्वोत्कृष्ट उत्पादने. प्राणी