AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या बिझनेसमनच्या मेहुणीच्या प्रेमात होता एजे; ‘बिग बॉस’च्या घरात फुलली लव्ह स्टोरी

अभिनेता राकेश बापट सध्या 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत एजेची मुख्य भूमिका साकारतोय. राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला तेव्हा, एका अभिनेत्रीवर त्याचं प्रेम जडलं होतं.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या बिझनेसमनच्या मेहुणीच्या प्रेमात होता एजे; 'बिग बॉस'च्या घरात फुलली लव्ह स्टोरी
Raqesh Bapat and VallariImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2024 | 1:57 PM
Share

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय. एजे आणि लीला अशी या दोघांच्या भूमिकांची नावं आहेत. मालिकेत एजेची भूमिका साकारणारा राकेश बापट त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. राकेशने अभिनेत्री रिधी डोग्राशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 2019 मध्ये राकेश आणि रिधी विभक्त झाले. त्याच्या दोन वर्षांनंतर राकेशच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एण्ट्री झाली होती. ‘बिग बॉस ओटीटी 1’मध्ये हे प्रेम फुललं होतं.

‘बिग बॉस ओटीटी 1’मध्ये राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टीच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा होती. शमिता शेट्टी ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आणि बिझनेसमन राज कुंद्राची मेहुणी आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस 15’मध्ये राकेश त्याची गर्लफ्रेंड शमिताला पाठिंबा देण्यासाठी परतला होता. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. या शोच्या काही महिन्यांतच दोघांनी ब्रेकअप केलं. बिग बॉसच्या घरात राकेश आणि शमिताची जोडी खूप लोकप्रिय होती. बिग बॉसच्या घरात दोघं एकमेकांना पाठिंबा देताना, एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. शो संपल्यावरही त्यांना डेटवर, फॅमिली फंक्शन्समध्ये, पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र काही कारणास्तव दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. या ब्रेकअपनंतर शमिताला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगला तिने सडेतोड उत्तरसुद्धा दिलं होतं.

‘माझ्या मते ही गोष्ट स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. राकेश आणि मी आता सोबत नाही आहोत’, असं शमिताने लिहिलं होतं. तर राकेशनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली होती. ‘शमिता आणि मी आता सोबत नाही आहोत. अत्यंत वेगळ्या परिस्थितीत नशिबाने आम्हाला एकत्र आणलं होतं. आम्हा दोघांवर प्रेम करणाऱ्या त्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. मला माझ्या ब्रेकअपविषयी असं जाहीररित्या सांगायचं नव्हतं. पण चाहते म्हणून तुम्हाला याबाबतची माहिती असावी म्हणून मी हे स्पष्ट केलं’, असं राकेशने लिहिलं होतं.

Follow Us
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम