Neena Gupta: ‘असा ड्रेस घालायला फार हिंमत लागते’; 63 वर्षीय नीना गुप्ता यांचा ‘हा’ अंदाज पाहून नेटकरी थक्क!

अखेर नीना गुप्ता यांनी 'तो' ड्रेस घालताच; वयाची साठी ओलांडलेल्या अभिनेत्रीचा तरुणींनाही लाजवेल असा लूक!

Neena Gupta: असा ड्रेस घालायला फार हिंमत लागते; 63 वर्षीय नीना गुप्ता यांचा हा अंदाज पाहून नेटकरी थक्क!
Neena Gupta
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 06, 2023 | 9:00 AM

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. एकल माता असणाऱ्या नीना या नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी बेधडकपणे बोलताना दिसल्या. त्यांची मुलगी मसाबा गुप्ता ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. वयाची साठी ओलांडलेल्या स्वत: नीनासुद्धा अनेकांसाठी फॅशन आयकॉन आहेत. इन्स्टाग्रामवर नुकताच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. नीना यांच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

‘असा ड्रेस घालणं म्हणजे खूप हिंमतीचं काम आहे, अखेर केली हिंमत’, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी काळ्या रंगाचा स्ट्रॅपी शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा हा बोल्ड लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

नीना यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. अभिनेत्री निम्रत कौरने त्यांना ‘हॉट’ असं म्हटलंय. तर एका चाहत्याने लिहिलंय ‘नेहमीप्रमाणे खूप सुंदर’. ‘तुम्ही कोणताही ड्रेस घातला तरी सुंदरच दिसणार’, अशा शब्दांत चाहत्यांनी कौतुक केलंय.

आपलं जीवन आपल्या अटी-शर्तींवर जगा, लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका, असं नीना गुप्ता नेहमी म्हणतात. त्यांच्या या व्हिडीओवरून याच बिनधास्त स्वभावाची झलक पहायला मिळते.

नीना आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचं नातं ८०च्या दशकात फार चर्चेत होतं. या दोघांनी लग्न केलं नाही. मसाबा ही नीना आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. विवियनशी लग्न जरी केलं नसलं तरी नीना यांनी मसाबा आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. खुद्द मसाबाने याविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं. “आईने कधीच माझं आणि वडिलांचं नातं बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही. वडिलांसोबत माझं चांगलं नातं आहे. आईने मला नेहमीच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे,” असं ती म्हणाली होती.