Neha Dhupia Video : आधी सोनाक्षी सिन्हा, आता पापाराझींवर भडकली नेहा धुपिया, डायरेक्ट झापलंच… असं काय घडलं ?

अभिनेत्री नेहा धुपियाने पापाराझींना 'बॅक शॉट्स' काढण्यावरून जोरदार फटकारले. एका इव्हेंटमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नेहाने स्पष्ट शब्दांत अशा कृतीवर आक्षेप घेतला. सोनाक्षी सिन्हानेही नेहाच्या या भूमिकेचे कौतुक करत तिला पाठिंबा दर्शवला.

Neha Dhupia Video : आधी सोनाक्षी सिन्हा, आता पापाराझींवर भडकली नेहा धुपिया, डायरेक्ट झापलंच... असं काय घडलं ?
फोटोग्राफर्सवर भडकली नेहा धुपिया
| Updated on: Jul 01, 2026 | 3:17 PM

Neha Dhupia Video : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या बेधडक अंदाजासाठी आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बोलताना ती काही भीडभाड बाळगत नाही. नुकतीच नेहा ही एका इव्हेंटला गेली होती, मात्र तेव्हा तिने तिथे पापाराझींना, फोटोग्राफर्सना चांगलंच झापलं. भडकलेल्या नेहाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पापाराझी हे अनेकदा अभिनेत्रींचे मागच्या बाजूने, बॅकसाईडने फोटो आणि व्हिडिओ काढतात, मात्र त्यावर आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आक्षेप घेतला आहे. इव्हेंटमध्ये पापाराझी हे नेहाच्या बाबतीत देखील असंच करत होते, ज्यामुळे ती चांगलीच संतापली.

रागावलेल्या नेहा धुपियाने पापाराझींना फटकारलं आणि अशा प्रकारे फोटो व व्हिडिओ काढणं थांबवण्यास तिने सांगितलं; आम्ही वारंवार हे सांगत तो तरीही तुम्ही ऐकत नाही, आता आमचा संयस संपला, असंही तिने फोटोग्राफर्सना ऐकवलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला असून विशेष म्हणजे, सोनाक्षी सिन्हानेही नेहा धुपियाच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी मागच्या बाजूने फोटो काढल्याबद्दल पापाराझींवर संताप व्यक्त केला होता.

नेहाने फोटोग्राफर्सना झापलं

अभिनेत्री नेहा धुपिया नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती. रेड कार्पेटवर असताना तिने पापाराझींना (फोटोग्राफर्स) खडे बोल सुनावलं. “अशा उद्धटपणे ‘बॅक शॉट्स’ (मागच्या बाजूचे फोटो) कोण काढतं?” असं तिने त्यांना डायरेक्ट विचारलं. ” असं करू नका… माझ्या बाबतीत तर अजिबातच नाही. कोणाच्याच बाबतीत असं करू नका. हे सांगून आम्ही आता कंटाळलो आहोत—तुम्हाला दुसरं काही काम नाही का? आम्ही बाहेर पडलो की तुम्ही हेच करता.” असं म्हणत नेहाने फोटोग्राफर्सना चांगलंच झापलं.

 

सोनाक्षीनेही दिला पाठिंबा

नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. त्याच्यावर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. अभिनेत्री सोनाक्षीसिन्हा हिनेदेखील या व्हिडीओवर कमेंट करत ‘वेल डन नेहा’.असं म्हणत नेहाला पाठिंबा दिला.

नेहा धूपियाचं काम

नेहा धुपियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती काही काळापूर्वी ‘परफेक्ट फॅमिली’ (Perfect Family) या वेब सीरिजमध्ये झळकली. हा एक उत्कृष्ट ड्रामा-कॉमेडी असून 25 जूनपासून सोनीलिव्ह (SonyLIV) वर त्याचे प्रसारण सुरू झाले आहे. या सीरिजमध्ये गुलशन देवैया, मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us