
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आई झाल्यानंतर लाईमलाईटपासून दूर राहतेय. ती फार क्वचितच पापारांझींच्या फोटोंमध्ये दिसते. आजकाल दीपिका तिच्या चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम करण्यासोबतच तिच्या फिटनेसवरही काम करत आहे आणि पूर्वीसारखीच तंदुरुस्त होऊ इच्छिते. दरम्यान, दीपिकाचा एक नवीन व्हिडिओ समोर सध्या व्हायरल झाला आहे.
दीपिकाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल
ती नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी, अभिनेत्रीने निळ्या रंगाचा लांब शर्ट घातला होता. तिने काळ्या चष्म्याने आणि केसांच्या स्टाईलिंगने तिचा लूक पूर्ण केला होता. दीपिकाकडे एक मोठी बॅग देखील होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर युजर्स तिच्या लूकवर कमेंट्स केल्या आहेत.तसेच बऱ्याच दिवसांनी पापारांझींनीही तिला स्पॉट केलं होतं.
दीपिकाला या लांब शर्टमध्ये पाहून युजर म्हणाले ‘पप्पांचा शर्ट…’
दीपिका पदुकोण मुंबई एअरपोर्ट विमानतळावर दिसली. सोशल मीडिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या लूक आणि आउटफिटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दीपिकाला या लांब शर्टमध्ये पाहून एका युजरने लिहिलं आहे. ‘पप्पांचा शर्ट घातलाय का?’ दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे ‘आम्ही चित्रपटांमध्ये तिला पाहण्यासाठी उत्सुक आहोत’, अजून एकाने लिहिलं आहे, ‘दीपिकाचे कान पहा, कोणीही परिपूर्ण नसतं’, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘ती वास्तविक जीवनात तसेच पडद्यावर सुंदर आहे’, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आता मला सांगा, ती तिच्या मुलीच्या नावाने ओळखली जाईल का, जसं की दुआची मम्मी’. दीपिकाच्या शर्टवरून बऱ्याच मजेशीर कमेंट आल्या आहेत.
दीपिकाच्या कामाबद्दल
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, दीपिका अॅटली दिग्दर्शित आगामी “AA22XA6” चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अलिकडेच, निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर करून दीपिकाच्या असण्याची पुष्टी केली आहे. अभिनेत्री लवकरच शुटिंग सुरू करणार आहे. याशिवाय दीपिका कल्कीच्या दुसऱ्या भागातही दिसणार आहे आहे.