
Vineet Kumar Singh : ‘ तुमच्या हिश्शाचं काम चुपचाप करा, तुमच्या हिश्शाचा जो मोठा प्लान आहे तो इतर कोणी आखत असेल..’ टीवी9 नेटवर्क च्या न्यूज9 ग्लोबल समिटच्य मंचावर अभिनेता विनीत कुमार सिंग यांनी हे विधान केलं. दुबईमध्ये सध्या न्यूज9 ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं असून तेथे अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. त्याच मंचावर अभिनेता विनीत कुमार सिंगही उपस्थित होता.
एकेकाळी असिस्टंड डिरेक्टर म्हणून काम करणारा विनीत कुमार सिंग याचं नशीब एका क्षणात पलटलं आणि त्याच्या नावाच्या हेडलाइन्स असतात. जे यश मिळालयं, तुमच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, असा सवाल त्याला विचारण्यात आला. ‘ या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की मी काल दुबईला आलो, इथे फिरतोय, हे पाहून असं वाटतंय जणू एखादी जादूच आहे. इथे समुद्र आणि वाळवंटात जे केलंय ते अगदी पाहण्यासारखं आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. हे कसं झालं, कोणी केलं हे मी त्या जागेवर जाऊन शोधण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करेन ‘ असं त्याने सांगितलं.
” मी अभिनेता म्हणून काम सुरू केलं, पण काही गोष्टी समजत नव्हत्या. मग मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची संधि मिळाली आणि नंतर गोष्टी सुरू केल्या. एकावेळी एक पाऊल टाकत, टप्प्याटप्प्याने मी पुढे जात राहिलो, असं करता करता दोन दशकं कधी गेली ते मला कळलंही नाही. आजही मला असं वाटतं की मी शिकतोच आहे” असं विनीत कुमार सिंगने नमूद केलं.
मी हे प्लान केलं नव्हतं…
“2025 साली, मी हा प्लान केला नव्हता. कारण सध्या अशी वेळ आली आहे की एखादा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यापूर्वी लोक चार वेळा विचार करतात, पण माझ्या बाबतीत असं घडलं की चार महिन्यांत माझे चार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालं. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या हिश्शाचं जे काम आहे ते शांतपणे करत रहा, तुमच्या हिश्शाचा जो मोठा प्लान आहे ती योजना इतर कोणीतरी आखत असतं “.
विनीत कुमार सिंह ज्या चार चित्रपटांबद्दल बोलत होते ते म्हणजे – सुपरबॉईज ऑफ मालेगाव, मॅच फिक्सिंग, छावा आणि जाट. या सर्व चित्रपटांमध्ये विनीतचं काम लोकांना खूप आवडलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘छावा’ हा चित्रपट सर्वात मोठा चित्रपट ठरला. जगभरात या चित्रपटाने 807.88 कोटी रुपयांची कमाई केली. सध्या विनीत हा चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव बनला आहे. तो जेव्हा जेव्हा कोणत्याही भूमिकेत पडद्यावर येतो तेव्हा आपल्या खणखणीत अभिनयाने तो लोकांची मनं जिंकतो.