निखिल पटेलने पाठवली दलजीत कौरला कायदेशीर नोटीस, पती पत्नीमधील वाद टोकाला, थेट ‘हा’ इशारा देत..

अभिनेत्री दलजीत कौर हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. दलजीत कौर आणि तिच्या पतीमधील वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर सतत दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना देखील दिसत आहेत. आता दलजीत कौरच्या अडचणीत वाढ झालीये.

निखिल पटेलने पाठवली दलजीत कौरला कायदेशीर नोटीस, पती पत्नीमधील वाद टोकाला, थेट हा इशारा देत..
daljeet kaur and nikhil patel
| Updated on: Jun 03, 2024 | 2:39 PM

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. दलजीत कौरच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सतत दलजीत कौर हिच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार रंगताना दिसतंय. यामध्ये दलजीत कौर हिने पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. यानंतर दलजीत कौरचा पती निखिल पटेल यानेही हैराण करणारे खुलासे केले. दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळतंय. दलजीत कौरने मार्च 2023 मध्ये निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. आता लग्नाला काही दिवस पूर्ण होताच यांचा घटस्फोट होतोय.

निखिल पटेल याने दलजीत कौर हिला कायदेशीर नोटीस पाठवल्याचे कळतंय. यामुळे दलजीत कौर हिच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्टपणे बघायला मिळतंय. निखिल पटेल याने भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (भारत) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 (भारत) अंतर्गत नोटीस दलजीत कौरला नोटीस पाठवलीये. निखिल पटेलच्या मते, सोशल मीडियावर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप करणे चुकीचे आहे.

दलजीत कौर हिने निखिल पटेल याच्यावर आरोप करत थेट म्हटले होते की, निखिल पटेल याचे विवाहबाह्य संबंध आहेत. हेच नाही तर आता निखिल पटेल याने दलजीत कौर हिला तिचे राहिलेले साहित्य घेऊन जाण्यास सांगितले आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत जर तिने तिचे साहित्य घेऊन गेले नाही तर ते दान केले जाईल, असेही सांगण्यात आलंय.

निखिल पटेल याने म्हटले की, जगातील एक सामान्य नागरिक म्हणून हे पाहणे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे की भारतात आणि जागतिकस्तरावर ऑनलाइन संरक्षण कायद्याच्या अभावाचा फायदा लोक घेतात. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे लोक सोशल मीडियावर काहीही पोस्ट शेअर करतात. यासोबत अजूनही काही आरोप निखिल पटेलकडून लावण्यात आलेत.

निखिलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कायदेशीर टीमकडून हे स्पष्ट करण्यात आले की, भविष्यात कोणत्याही प्रकारचे शोषण सहन केले जाणार नाहीये. जर दलजीत काैरने तिचे बेकायदेशीर कृत्य सुरूच ठेवले तर तिच्यावर कठोरपणे कायदेशीर कारवाई ही केली जाईल. आता यावर अजून दलजीत कौर हिच्याकडून काहीही भाष्य करण्यात नाही आले. यावर दलजीत कौर काय भाष्य करते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.