‘बडे अच्छे लगते है 2’च्या सेटवर अभिनेत्रीला दुखापत; सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान नुकताच एक अपघात झाला. या अपघातात नितीला दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना याविषयीची माहिती दिली.

बडे अच्छे लगते है 2च्या सेटवर अभिनेत्रीला दुखापत; सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो
'बडे अच्छे लगते है 2'च्या सेटवर अभिनेत्रीला दुखापत
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 21, 2023 | 2:00 PM

मुंबई : ‘कैसी ये यारियाँ’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निती टेलर सध्या ‘बडे अच्छे लगते है 2’मध्ये मुख्य भूमिका साकारतेय. या मालिकेत ती प्राची कपूरची भूमिका साकारतेय. याआधी मालिकेत अभिनेता नकुल मेहता आणि दिशा परमार हे मुख्य भूमिका साकारत होते. मात्र या दोघांनी मालिका सोडल्यानंतर त्यात नवीन कलाकारांची एण्ट्री झाली. सध्या नितीसोबत अभिनेता रणदीप राय यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान नुकताच एक अपघात झाला. या अपघातात नितीला दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना याविषयीची माहिती दिली.

नितीने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्या खांद्यापासून कोपरापर्यंत मार लागल्याचं पहायला मिळतंय. तिच्या दुखापतीचा फोटो पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत आणि प्रकृतीविषयी विचारपूस करत आहेत. चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

नीती टेलरने 2009 मध्ये केलं पदार्पण

निती टेलरने वयाच्या 15 व्या वर्षापासून मालिकेत काम करायला सुरुवात केली. ‘प्यार का बंधन’ या मालिकेतून तिने करिअरची सुरुवात केली. ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र नितीला खरी लोकप्रियता ‘कैसी ये यारियाँ’ या मालिकेमुळे मिळाली. यामध्ये अभिनेता पार्थ समथानसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर तिने क्राइम थ्रिलर ‘गुलाम’ आणि ‘इश्कबाज’ यांसारख्या मालिकेत काम केलं.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही केलं काम

निती टेलरला अभिनयासोबतच नृत्याचीही खूप आवड आहे. ‘झलक दिखला जा 10’मध्ये तिने कोरिओग्राफर आकाश थापासोबत भाग घेतला होता. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ती पार्थ समथानसोबत ‘बिग बॉस 16’मध्ये पोहोचली होती. सलमान खानच्या या शोमध्ये दोघं ‘कैसी ये यारियाँ’ या मालिकेच्या चौथ्या सिझनचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी नितीने सलमानसोबत डान्ससुद्धा केला.