‘ती पुन्हा भारतात कधीच येणार नाही’; जगप्रसिद्ध मॉडेलसोबतचं वरुण धवनचं वागणं पाहून भडकले नेटकरी

ज्याप्रकारे ती नंतर पळाली, ते पाहून असं वाटतंय की ती भारतात परत कधीच येणार नाही', अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. 'हेच वरुणच्या पत्नीसोबत कोणी केलं तर', असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

ती पुन्हा भारतात कधीच येणार नाही; जगप्रसिद्ध मॉडेलसोबतचं वरुण धवनचं वागणं पाहून भडकले नेटकरी
Varun Dhawan and Gigi Hadid
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2023 | 9:05 AM

मुंबई : नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा जलवा पहायला मिळाला. प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह ‘स्पायडर मॅन’ फेम टॉम होलँड, झेंडाया, गिगी हदिद यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लावले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी हटके अंदाजात दिसले. यावेळी बॉलिवूडच्या काही कलाकारांनी मंचावर जबरदस्त परफॉर्मन्स केला. रणवीर सिंग, वरुण धवन, शाहरुख खान यांच्या डान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता वरुण धवनचा हा व्हिडीओ असून त्यावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. या व्हिडीओमध्ये वरुणसोबत अमेरिकी सुपरमॉडेल गिगी हदिद पहायला मिळतेय. मंचावर परफॉर्म करणारा वरुण अचानक गिगीला बोलावतो आणि तिला उचलून घेतो. त्यानंतर ती जेव्हा स्टेजवरून उतरत असते तेव्हा तो तिच्या गालावर किस करतो. वरुणचं हेच वागणं नेटकऱ्यांना पसंत पडलं नाही.

पहा व्हिडीओ

‘हे खूपच अपमानकारक आहे. ती किती अनकम्फर्टेबल झाली हे स्पष्ट दिसतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘असं करण्याची काहीच गरज नव्हती. ज्याप्रकारे ती नंतर पळाली, ते पाहून असं वाटतंय की ती भारतात परत कधीच येणार नाही’, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘हेच वरुणच्या पत्नीसोबत कोणी केलं तर’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. ‘मंचावर सर्वांसमोर असं काही करण्याआधी किमान तिला विचारा तरी’, असंही युजर्सनी म्हटलंय.

याआधीही वरुण अशाच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत फोटो शूट करताना त्याने अचानक तिच्या गालावर किस केलं होतं. त्यावेळी कियाराही आश्चर्यचकित झाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरुणला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा वरुण नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

कोण आहे गिगी हदिद?

गिगी हदिद ही डच-पॅलेस्टाइन मॉडेल आहे. जेलेना नौरा हदिद असं तिचं नाव आहे. लॉस एंजिलिसमध्ये तिचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं. तिने आजवर अत्यंत प्रतिष्ठित फॅशन शोजमध्ये हजेरी लावली असून प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहेत.