Bigg Boss 17 : ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट किंवा खानजादी नव्हे तर ‘ही’ स्पर्धक बिग बॉसमधून बाहेर?

15 ऑक्टोबरपासून बिग बॉसचा सतरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सिझनमध्ये काही नवीन थीम आणि नवीन नियम बिग बॉसने आखले आहेत. अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करत आहे. यंदाच्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान हा अभिषेक कुमार आणि विकी जैन या दोघांची चांगलीच शाळा घेणार आहे.

Bigg Boss 17 : ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट किंवा खानजादी नव्हे तर ही स्पर्धक बिग बॉसमधून बाहेर?
Bigg Boss 17
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2023 | 5:16 PM

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 | ‘बिग बॉस 17’ या लोकप्रिय रिॲलिटी शोचा दुसरा आठवडा संपुष्टात येत आहे. शोचा पहिलाच आठवडा असल्याने सूत्रसंचालक सलमान खानने कोणताच स्पर्धक घराबाहेर जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता दुसऱ्या आठवड्यात घरातील 17 स्पर्धकांपैकी एक जण बेघर होणार आहे. नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना त्यांची बॅग भरून ठेवावी लागणार आहे. बिग बॉसच्या या सिझनमधून घराबाहेर पडणाऱ्या सर्वांत पहिल्या स्पर्धकाच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सोनिया बंसल ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार असल्याचं कळतंय. ‘बिग बॉस’चे सर्व अपडेट्स देणाऱ्या एका सोशल मीडिया पेजवर ही माहिती देण्यात आली आहे.

‘सोनिया बंसल ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. घरातील इतर स्पर्धकांना सोनिया आणि सना या दोघींपैकी एकीला वाचवायचं होतं. तेव्हा बऱ्याच जणांनी सनासाठी मतं दिली आणि तिला वाचवलं. त्यामुळे सोनियाला घराबाहेर पडावं लागलं’, असं ट्विट ‘बिग बॉस तक’ या अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. मात्र याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

सोनिया बंसलवरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सोनियापेक्षा सनाने बाहेर पडायला पाहिजे होतं. पण पुढच्या आठवड्यात तीच घराबाहेर जाऊ शकते’, असं एकाने लिहिलं. तर ‘यानंतर नाविद बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल’, असा अंदाज दुसऱ्या युजरने वर्तवला. ‘सोनिया ही सनापेक्षा जास्त सक्रीय होती. त्यामुळे तिच्याऐवजी सनाला बाद करायला पाहिजे होतं’, असंही काहींनी म्हटलंय.

या आठवड्यात बिग बॉसने घरातील काही नियम बदलले आहेत आणि त्याचसोबत स्पर्धकांचे रुम्ससुद्धा त्यांनी बदलले आहेत. यामुळे नवी मैत्री आणि काही नवे वादसुद्धा निर्माण झाले आहेत. सोनिया बंसलसोबत नॉमिनेट झालेल्या इतर स्पर्धकांमध्ये सना रईस खान, सनी आर्या, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, फिरोजा खान ऊर्फ खानजादी आणि नावद सोले यांचा समावेश आहे.