AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USA India Relation : डोनाल्ड ट्रम्प भारताच्या प्रेमात, एक निर्णय फारच आवडला; म्हणाले…

Shanti Bill : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अणुउर्जेशी संबंधित असणारे शांती विधेयक सादर करण्यात आले होते. अमेरिकेने भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

USA India Relation : डोनाल्ड ट्रम्प भारताच्या प्रेमात, एक निर्णय फारच आवडला; म्हणाले...
Modi and Trump
| Updated on: Dec 22, 2025 | 9:28 PM
Share

भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही काळापासून ताणलेले आहेत, मात्र आता दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेने भारताच्या एका निर्णयाचे स्वागत केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अणुउर्जेशी संबंधित असणारे शांती विधेयक सादर करण्यात आले होते. अमेरिकेने या विधेयकाचे स्वागत करताना म्हटले की, ‘आम्ही भारताच्या शांती विधेयकाचे स्वागत करतो, जे मजबूत ऊर्जा सुरक्षा भागीदारी आणि शांततापूर्ण नागरी अणु सहकार्याकडे जाणारे एक पाऊल आहे.’

अमेरिकेने काय म्हटले?

नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने सोशल माडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, “आम्ही भारताच्या नवीन शांती विधेयकाचे स्वागत करतो, हे विधेयक मजबूत ऊर्जा सुरक्षा भागीदारी आणि शांततापूर्ण नागरी अणु सहकार्याकडे टाकलेले एक पाऊल आहे. ऊर्जा क्षेत्रात संयुक्त नवोपक्रम, संशोधन आणि विकास करण्यास अमेरिका तयार आहे.”

राष्ट्रपतींच्या संमतीनंतर शांती विधेयकाचे कायद्यात रुपांतर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळाल्यानंतर हे विधेयक अंतिम स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गेले होते. राष्ट्रपतीने 20 डिसेंबर रोजी या विधेयकावर सही केली. त्यामुळे आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकात नागरी अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सर्व कायदे एकत्रित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता शांतता विधेयक अणुऊर्जा कायदा, 1962 आणि अणु नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा, 2010 हे कायदे रद्द झाले आहेत. या नव्या कायद्यामुळे खाजगी कंपन्यांना अणुऊर्जा प्रकल्प बांधणे, मालकी घेणे आणि चालवण्याची सरकारकडून परवानगी मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींकडून आनंद व्यक्त

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर करणे हा आपल्या तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले होते. ज्या खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला त्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले होते. एआयचा वापर आणि हरित उत्पादन सक्षम करण्यापर्यंत या विधेयकात तरतुदी आहेत. त्यामुळे भविष्यात याचा तुम्हाला फायदा होणार आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.