
नीता आणि मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. बॉलिवूडपासून हॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र त्या सर्वांमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरने नेटकऱ्यांची मनं जिंकली.

कल्चरल सेंटरचं उद्घाटन असल्याने सांस्कृतिक थीमला अनुसरून बऱ्याच सेलिब्रिटींनी कपडे परिधान केले होते. मात्र अनेकांच्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये वेस्टर्न टच पहायला मिळाला. श्रद्धाच्या ड्रेस आणि लूकमध्ये मात्र दोघांचं मिलन पहायला मिळालं.

काळ्या रंगाचा ड्रेस, त्यावरील दागिने आणि साधा मेकअप.. अशा लूकमध्ये श्रद्धाने या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'त्या सर्व सेलिब्रिटींमध्ये फक्त हीच सुंदर दिसतेय', असं एकाने लिहिलंय. तर 'श्रद्धालाच थीमचा खरा अर्थ समजलेला आहे', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'सर्वोत्कृष्ट ड्रेसचा पुरस्कार श्रद्धालाच मिळाला पाहिजे', असंही एका नेटकऱ्याने लिहिलं आहे.

श्रद्धाचा ड्रेस, कपाळावरील टिकली आणि वेणी.. सर्वकाही अत्यंत आकर्षक वाटतंय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. श्रद्धा कपूरची ड्रेसिंग स्टाइल कौतुकास्पद असते, असंही अनेकांनी म्हटलंय.