
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमांमुळे प्रसिद्धीझोतात आली. नुसरत आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या नुसरत २०२१ साली प्रदर्शित झालेल्या हॉरर ‘छोरी’ सिनेमातच्या सिक्वलच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्री जखमी झाली आहे. खुद्द अभिनेत्रीने जखमी झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. नुसरत ॲक्शन सिक्वेंस शुट करताना जखमी झाली आहे. अभिनेत्रीने जखमी झाल्याची माहिती देताच चाहते नुसरतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
अभिनेत्रीच्या चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. जखमी झाल्यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्रीची मैत्रिण इशिता राज हिने देखील नुसरतला जखमेच्या ठिकाणा टाके लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे इशिताचीच पोस्ट नुसरतने रिपोस्ट केली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र नुसरतचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नुसरत कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. एवढंच नाही, तर आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी नुसरत तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कामय चर्चेत असते. ‘प्यार का पंचनामा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेमध्ये देखील तुफान वाढ झाली.
अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील नुसरतच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळतं.