मी दारू पिऊन किसिंग सीन शूट केले…प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Nyrraa Banerji : प्रसिद्ध अभिनेत्री नायरा बॅनर्जीनं एका मुलाखतीत इंटिमेट सीनच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे.

नायरा बॅनर्जी ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून तिनं ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम केलं आहे. अभिनेत्रीनं गल्टा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, एका इंटिमेट सीनच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे.
नायरा म्हणाली, 'प्रोडक्शन आधीच खोलीत एक ट्रे आणून ठेवतं. त्यात च्युइंग गम, परफ्यूम आणि सॅनिटायझर असतं. प्रोडक्शन सर्व काही आधीच पुरवतं.'
'वन नाईट स्टँड' या सिनेमातील इंटिमेट सीनबद्दल सांगताना नायरा म्हणाली की, 'त्यावेळी ती रिलेशनशिपमध्ये होती. तिच्या सह-अभिनेत्यासोबत तिचं भावासारखं नातं होते. त्यामुळेच तिला अस्वस्थ वाटत होतं.'
'त्यावेळी इंटिमसी कोऑर्डिनेटर नव्हते. दिग्दर्शकच सीन्सचं कथन करायचे. आम्ही खूप रिहर्सल केल्या. आम्ही भावनिक जवळीक निर्माण करायचो. पण जेव्हा एकमेकांच्या जवळ येण्याचा विषय आला, तेव्हा आमची परिस्थिती बिघडली. मी रडायला लागले. मी सेटवरून पळून गेले. मी म्हणाले, 'आई, माझा बॉयफ्रेंड मला मारून टाकेल.''
'मग दिग्दर्शकाने मला वोडकाचे शॉट्स प्यायला लावले. त्यानंतरच मी तो शॉट केला. शूटिंगच्या दिवशी, मी माझ्या बॉयफ्रेंडला 'आय लव्ह यू' असा मेसेज केला. जेव्हा माझ्या बॉयफ्रेंडला कळलं की, मी किसिंग सीन केले आहेत, तेव्हा तो थोडा रागावला आणि त्याने माझ्या आईकडे तक्रार केली.'
'पण माझ्या आईनं त्याला समजावून सांगितलं की, या इंडस्ट्रीत हे सामान्य आहे. त्यानं हे समजून घेतलं पाहिजे.' नायरानं सांगितलं की, तिने तिच्या बॉयफ्रेंडमुळे असे अनेक बोल्ड प्रोजेक्ट्स नाकारले आहेत.