
छोट्या पडद्यावर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेच अनोख कथानक, नवे चेहरे या सगळ्यामुळेच प्रेक्षकांची या मालिकेला पसंती मिळत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अर्थात ‘ओम’ साकारणाऱ्या अभिनेता शाल्व किंजवडेकर हा नवा चेहरा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

नुकतंच ओमचा वाढदिवस पार पडला आहे. त्यानिमित्त झी मराठीकडून हटके सेलीब्रेशन करण्यात आलं आहे.

सध्या येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचं चित्रिकरण सुरू आहे.

या सेटवरच ओमचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

एवढंच नाही तर ओमला एक सुंदर फोटोफ्रेमसुद्धा गिफ्ट मिळाली आहे. सोबतच सगळ्यांनी हे धमाल केलीये.