Oscar Awards 2021 | डिंपल कपाडियांच्या चित्रपटाने पटकावला ऑस्कर, प्रियंकाच्या पदरी निराशा, पाहा यादी…

| Updated on: Apr 26, 2021 | 3:53 PM

प्रत्येकजण ‘ऑस्कर 2021’ची आतुरतेने वाट पाहत होता. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याकडे प्रत्येकाचे लक्ष लागलेले असते. यंदाही कोणता चित्रपट, अभिनेता आणि अभिनेत्री हा पुरस्कार जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

1 / 6
प्रत्येकजण ‘ऑस्कर 2021’ची आतुरतेने वाट पाहत होता. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याकडे प्रत्येकाचे लक्ष लागलेले असते. कोणता चित्रपट, अभिनेता आणि अभिनेत्री हा पुरस्कार जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदा हा सोहळा अगदी वेगळ्या प्रकारे पार पडत आहे. या वर्षी कोणतेही होस्ट किंवा प्रेक्षक या सोहळ्यात उपस्थित नाहीत. या वर्षी कोणी-कोणी हे पुरस्कार पटकावले, ते जाणून घेऊया...

2 / 6
यावर्षी अभिनेता अँथनी होपकिन्सला ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाय या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

3 / 6
‘ऑस्कर 2021’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यावर्षी फ्रान्सिस मॅकडॉर्मंडने जिंकला आहे. 'नोमाडलँड' चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी त्यांना हे पदक देण्यात आले आहे.

4 / 6
यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘नोमाडलँड’ला मिळाला आहे. या चित्रपटाने यंदा बरेच पुरस्कार जिंकले आहेत. या चित्रपटासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मांड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

5 / 6
प्रियंका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले प्रकारातही नामांकन देण्यात आले होते. पण यावर्षीसुद्धा भारत आपल्याकडे ऑस्कर पुरस्कार आणू शकलेला नाही. सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेसाठी ‘द फादर’ला ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

6 / 6
डिंपल कपाडिया यांच्या ‘टेनेट’ या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.