दिल्लीच्या फेमस वडापाव गर्लला मिळाली मोठी ऑफर; प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये दिसणार?

Delhi Vadapav Girl Chandrika Gera Dixit may be inter in Big Boss OTT 3 : वडापाव विक्री करणाऱ्या तरूणीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. ही वडापाव गर्ल म्हणजे चंद्रिका गेरा दीक्षित... चंद्रिका ही आता बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. वाचा सविस्तर...

दिल्लीच्या फेमस वडापाव गर्लला मिळाली मोठी ऑफर; प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये दिसणार?
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 1:23 PM

वडापाव… कधी भूक लागल्यावर अडीनडीला खाल्ला जाणारा तर कधी चवीने खाल्ला जाणारा… पण याच वडापावने एका तरूणीचं आयुष्य बदललं आहे. दिल्लीच्या फेमस वडापाव गर्लचा एखादा तरी व्हीडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल. तिच्या व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. आता याच वडापाव गर्लला मोठी ऑफर आली आहे. दिल्लीची फेमस वडापाव गर्ल लवकरच रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. बिग बॉस ओटीटीचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये दिल्लीची वडापाव गर्ल दिसणार असल्याची माहिती आहे.

दिल्लीची वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका गेरा दीक्षित ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. बिग बॉस ओटीटी 3 च्या मेकर्सने चंद्रिकाला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारलं आहे. पण अद्याप तिचं नाव फायनल झालेलं नाही. जर चंद्रिका बिग बॉस ओटीटी 3 सहभागी झाली. तर राडा पाहायला मिळू शकतो. कारण वडपाव विक्रेती ही तिची ओळख आहेच. शिवाय ती तिच्या ड्राम्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे बिग बॉस ओटीटी 3 चंद्रिका सहभागी झाली तर प्रेक्षकांना ड्रामा पाहायला मिळू शकतो.

‘वडापाव गर्ल’ कोण?

चंद्रिका गेरा दीक्षित ही ‘वडापाव गर्ल’ नावाने दिल्लीत प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर वडापाव विकणारी तरूणी सध्या देशभरात प्रसिद्ध झाली आहे. तिचा मुलगा आजारी पडला. तेव्हा नोकरी सोडून चंद्रिकाने वडापाव विकण्यातचा व्यवसाय सुरु केला. हळूहळू तिचा व्यवसाय वाढत गेला. लोक रांगा लावून तिच्याकडचा वडापाव खातात. सेम टू सेम मुंबई स्टाईल वडापाव आम्ही बनवतो. वडापावची चटणीही मुंबईसारखीच आहे. माझा वडापाव प्रचंड टेस्टी आहे. इतका चविष्ट वडापाव तुम्हाला पूर्ण दिल्लीत कुठेच खायला मिळणार नाही, असा दावा चंद्रिका वारंवार करते.

50 रुपयांना चंद्रिका दीक्षित वडापाव विकते. तिचा वडापाव खाण्यासाठी खवय्ये गर्दी करतात. नुकतंच तिने वडापावचं नवं हॉटेलही सुरु केलं आहे. चंद्रिकाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते. तिची बोलण्याची स्टाईल कुणाला आवडते. तर कुणाला तिचं बोलणं उद्धट वाटतं. पण असं जरी असेल तरी चंद्रिकाचे व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यामुळे चंद्रिका जर बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आली. तर प्रेक्षकांना ड्रामा पाहायला मिळू शकतो.

Non Stop LIVE Update
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.