Pushpa The Rise : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘पुष्पा’चा ‘अॅमेझॉन’वर होणार प्रिमियर!
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा पुष्पा : द राइज (Pushpa The Rise) हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालतोय. हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइम(Amazon Prime)वर उपलब्ध होणार आहे.

मुंबई : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा पुष्पा : द राइज (Pushpa The Rise) हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालतोय. सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित 7 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिस(Box Office)वर उत्कृष्ट कामगिरी केलीय. या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी म्हणजे हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइम(Amazon Prime)वर उपलब्ध होणार आहे.
विक्रमावर विक्रम
सध्या तिसर्या आठवड्यात, पुष्पा अजूनही थिएटरमध्ये चांगला चालतोय. 18व्या दिवशी (रविवार) या सिनेमान बॉक्स ऑफिसवर जगभरात 300 कोटींचा गल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा हा चित्रपट केवळ सहावा दक्षिण भारतीय चित्रपट ठरलाय.
अॅमेझॉनवर येणार
बुधवारी Amazon प्राइम व्हिडिओनं एक ट्विट शेअर केलं, त्यात त्यांनी पुष्पाची तारीख जाहीर केली. अल्लू अर्जुनचा “पुष्पा: द राइज” 7 जानेवारी रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे. तेलुगू अॅक्शन थ्रिलर 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषांसह डब आवृत्त्यांमध्येदेखील प्रदर्शित झाला. Amazon Prime Videoच्या अधिकृत ट्विटर पेजनं चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा केली.
हिंदी सिनेमे पाहत आला अल्लू अर्जुन
अलीकडेच अल्लू अर्जुननं त्याच्या पुष्पा चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत, लहानपणापासून हिंदी चित्रपट पाहत कसा मोठा झालो आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करणं हा त्याच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग कसा याविषयी खुलासा केला होता. अल्लू अर्जुननं मुंबईतल्या पुष्पा या चित्रपटाच्या विशेष कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडमधील चित्रपटांच्या निवडीबद्दल खुलासा केला होता.
फेब्रुवारीत येणार दुसरा भाग
सुकुमार दिग्दर्शित, या चित्रपटात जगपती बाबू, प्रकाश राज, धनंजय, अनसूया भारद्वाज, हरीश उथमन आणि वेनेला किशोर यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. पुष्पाचे दोन भाग असून दुसरा भाग या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होईल. SS राजामौली दिग्दर्शित RRR पुढे ढकलला गेलाय. या आठवड्यात कोणतेही बिग बजेट सिनेमे रिलीज न झाल्यानं बॉक्स ऑफिसवर पुष्पा अजून चालू राहण्याची अपेक्षा आहे.