Radhe Shyam Postponed | प्रभासच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार! ‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर!

Radhe Shyam Postponed | प्रभासच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार! ‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर!
Radhe Shyam

'जर्सी’, ‘आरआरआर’ आणि ‘पृथ्वीराज’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर चित्रपट ‘राधे श्याम’ देखील बॅकफूटवर आला आहे. 'राधे श्याम'च्या निर्मात्यांनी कोरोना संसर्गाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 05, 2022 | 12:29 PM

मुंबई : ‘जर्सी’, ‘आरआरआर’ आणि ‘पृथ्वीराज’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर चित्रपट ‘राधे श्याम’ देखील बॅकफूटवर आला आहे. ‘राधे श्याम’च्या निर्मात्यांनी कोरोना संसर्गाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सिनेमा हॉल एकतर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत किंवा ते निम्म्या क्षमतेने चालवले जात आहेत.

UV Creationच्या ट्वीटनुसार, राधे श्याम चित्रपट आता पुढे ढकलण्यात आला आहे. ट्विटनुसार, ‘राधे श्यामचे प्रदर्शन अधिकृतपणे पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच चित्रपटगृहात भेटू.’, असे म्हटले आहे. ‘राधे श्याम’ हा चित्रपट 14 जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता आणि प्रभासला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.

पाहा पोस्ट :

कोरोनाचं संकट तर, ओटीटीची ऑफर!

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता प्रभासच्या आगामी ‘राधे श्याम’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार असून ट्रेलरमध्ये दोघांची धमाकेदार केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत आता सर्वांनाच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे, मात्र कोरोना व्हायरसने चित्रपट जगतासमोर पुन्हा संकट उभे केले आहे.

त्याच वेळी, आता निर्मात्यांना OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या ऑफर देखील येत आहेत. वृत्तानुसार, प्रभास आणि पूजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ चित्रपट OTT वर रिलीज करण्यासाठी निर्मात्यांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे आणि ही माहिती ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी दिली आहे.

मनोबाला विजयबालन यांनी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘राधे श्याम’ OTT वर थेट रिलीज करण्यासाठी निर्मात्यांना 400 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. तथापि, अद्याप निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही, त्यामुळे अद्याप यावर जास्त काही सांगता येणार नाही.

ज्योतिषाची भूमिका साकारणार प्रभास

प्रभास आणि पूजा हेगडे यांचा हा चित्रपट राधाकृष्ण कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. या चित्रपटात प्रभास ‘विक्रमादित्य’ या ज्योतिषाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात पूजा आणि प्रभासशिवाय सचिन खेडेकर, कृष्णम राजू, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर आणि सत्यन असे अनेक स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगु व्यतिरिक्त, तो कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें