कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?
Bollywood Celebs

तुम्ही-आम्ही काय तर आपल्यापैकी अनेक लोक नशिबावर विश्वास ठेवत नेहमी पुढे जातात. जगाची प्रगती झाली तरी लोकांचा नशिबावरील विश्वास कमी झालेला नाही. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटींचाही असा नशिबावर विश्वास आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 05, 2022 | 8:45 AM

मुंबई : तुम्ही-आम्ही काय तर आपल्यापैकी अनेक लोक नशिबावर विश्वास ठेवत नेहमी पुढे जातात. जगाची प्रगती झाली तरी लोकांचा नशिबावरील विश्वास कमी झालेला नाही. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटींचाही असा नशिबावर विश्वास आहे. प्रत्येक बॉलिवूड कलाकाराकडे आपला आपला स्वतःचा असा एक ‘लकी चार्म’ आहे. चला तर जाणून घेऊया यात कशाकशाचा समवेश आहे…

सलमान खान

सलमान खानचा लकी चार्म म्हणजे त्याचे ब्रेसलेट. नीलमणी खड्याने जडवलेले सलमानचे हे ब्रेसलेट त्याच्यासाठी खूप लकी आहे. त्याच्या या ब्रेसलेटमुळेच तो वाईट नजरेपासून नेहमी वाचत असल्याचे खुद्द सलमाननेही सांगितले आहे. याशिवाय सलमान ईदलाही स्वत:साठी चांगला दिवस मानतो. तो दरवर्षी ईदला त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो आणि नशीब पहा, ईदला प्रदर्शित झालेले त्यांचे बहुतेक चित्रपट हिट आहेत.

कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा देखील नशिबावर विश्वास आहे. अभिनेत्री तिचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अजमेर शरीफ येथे जाऊन आशीर्वाद घेते.

विद्या बालन

विद्या बालन तिच्या मेकअपमध्ये काजळाचा समावेश करते. विद्याचा हाश्मी काजळावर खूप विश्वास आहे आणि ती हे काजळ केवळ तिच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही, तर नशीबासाठी देखील लावते. अभिनेत्रीला वेगवेगळ्या मण्यांचीही विशेष आवड आहे. हाश्मी काजळ आणि मणी यांनी बॉलिवूड आणि वैयक्तिक आयुष्यातही तिचं आयुष्य बदलून टाकलं असं विद्या मानते.

काजल

काजोलचा तिच्या हिऱ्याने जडलेल्या ओम अंगठीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. रिपोर्टनुसार, ही अंगठी तिला तिचा पती अजय देवगणने गिफ्ट केली होती. काजोलने हा लकी चार्म तिच्या उजव्या हाताच्या बोटात घातला आहे. अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की यामुळे तिला नेहमी शांत राहण्यास मदत होते.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी अध्यात्माशी खूप संबंधित आहे. तिने तिच्या उजव्या हाताच्या बोटात पन्ना जडवलेली अंगठी घातली आहे. ही अंगठी तिला तिच्या आईने भेट दिली होती. या अंगठीने तिच्या करिअरला नवा आयाम दिला आहे, असा विश्वास अभिनेत्रीने व्यक्त केला होता.

रणवीर सिंह

रणवीर सिंहने त्याच्या पायात काळ्या रंगाचा धागा बांधला आहे. बातम्यांनुसार, हा काळा धागा रणवीरच्या आईने त्याच्या पायाला बांधला होता कारण अभिनेता वारंवार आजारी आजारी पडायचा. हा काळा धागा बांधल्यानंतर रणवीरची आजारांपासून सुटका झाली, असे तो म्हणतो.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी स्टार्समध्ये येतात. पण या बॉलिवूड मेगास्टारच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांचे दिवाळे निघाले होते, हातात कोणतेही चित्रपट नव्हते. यानंतर अमिताभ यांनी नीलम खडा जडवलेली अंगठी घातली, त्यानंतर त्यांच्याकडे कामे येण्यास सुरूवात झाली. ही लकी अंगठी आजही अमिताभ बच्चन नेहमी परिधान करतात.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें