Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?
Khatija

म्युझिक इंडस्ट्रीचा बादशाह एआर रहमान (AR Rahman) यांची मुलगी खातिजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इकडे 2022ची सुरुवात झाली आहे आणि दुसरीकडे खातिजाने (Khatija) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 03, 2022 | 10:42 AM

मुंबई : म्युझिक इंडस्ट्रीचा बादशाह एआर रहमान (AR Rahman) यांची मुलगी खातिजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इकडे 2022ची सुरुवात झाली आहे आणि दुसरीकडे खातिजाने (Khatija) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. खरं तर एआर रहमानची मुलगी खतिजा हिची एंगेजमेंट झाली आहे. तिने स्वतः ही गोष्ट इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एंगेजमेंटचे फोटो पोस्ट करून तिने तिच्या भावी पतीची जगाला ओळख करून दिली आहे.

खातिजा हिची एंगेजमेंट रियासदीन शेख मोहम्मद याच्याशी झाली आहे, जो व्यवसायाने ऑडिओ इंजिनियर आहे. विशेष म्हणजे खतिजा हिच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही एंगेजमेंट झाली होती. चाहत्यांसोबत आनंदाचे क्षण शेअर करताना खतिजाने लिहिले की, ‘देवाच्या आशीर्वादाने, उद्योजक आणि ऑडिओ अभियंता रियासदीन शेख मोहम्मद यांच्यासोबत एंगेजमेंटची घोषणा करताना आनंद होत आहे. 29 डिसेंबरला माझ्या वाढदिवशीच ही एंगेजमेंट झाली, ज्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे लोक सहभागी झाले होते.’

पाहा पोस्ट :

फोटोमध्ये खातिजा गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केलेली दिसत आहे. खातिजाने कपड्यांशी जुळणारा डिझायनर मास्कही परिधान केला आहे. या फोटोत तिने चेहरा दाखवलेला नाही, पण नव्या प्रवासाचा आनंद तिच्या डोळ्यांत नक्कीच दिसतो आहे. त्याचवेळी तिने रियासदीन शेख मोहम्मदचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूपच स्मार्ट दिसत आहे.

हिजाबमुळे झाली होती ट्रोल

काही महिन्यांपूर्वी, लेखिका तस्लिमा नसरीन यांनी खातिजाला तिच्या हिजाबावरून ट्रोल केले होते. तस्लिमा नसरीन म्हणाल्या होत्या की, जेव्हा मी सुशिक्षित लोकांना बुरख्यात पाहते, तेव्हा माझा श्वास गुदमरतो. लेखिकेच्या म्हणण्याला उत्तर देताना खातिजा म्हणाली की, तिने केलेल्या निवडीबद्दल तिला अजिबात पश्चात्ताप नाही.

खातिजा यांनी तस्लिमा नसरीनला सडेतोड उत्तर दिले आणि म्हणाली की, ‘माझे कपडे पाहून तुमचा श्वास गुदमरत असेल तर जा आणि शुद्ध हवा खा. मी माझ्या कपड्यांमध्ये अजिबात गुदमरत नाही, परंतु त्याचा अभिमान बाळगते.’ आता चाहते आणि नेटकरी खातिजाला तिच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

नवविवाहित अंकिता लोखंडेच्या बॅकलेस मादक लूकने केलं घायाळ, पाहा नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक PHOTOS

टांझानियन कलाकारानं केलं हिंदी गाण्याचं रि-क्रिएशन! ‘हा’ Video पाहा, होतोय तुफान Viral!!

Bigg Boss 15 : बॉबी देओलनं साकारली होती धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका, वडिलांनी सांगितला किस्सा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें