टांझानियन कलाकारानं केलं हिंदी गाण्याचं रि-क्रिएशन! ‘हा’ Video पाहा, होतोय तुफान Viral!!

टांझानियन कलाकारानं केलं हिंदी गाण्याचं रि-क्रिएशन! 'हा' Video पाहा, होतोय तुफान Viral!!
किली पॉल

टांझानिया(Tanzania)त राहणाऱ्या किली पॉल(Kili Paul)नं सोशल मीडिया(Social Media)वर धमाका उडवून दिलाय. इन्स्टाग्राम(Instagram)वर त्याचे व्हिडिओ खूप आवडीनं पाहिले जातायत. तो अनेकदा बॉलिवूड (Bollywood) गाण्यांवर लिपसिंक (Lipsync) करताना दिसतो.

प्रदीप गरड

|

Jan 02, 2022 | 5:48 PM

मुंबई : टांझानिया(Tanzania)त राहणाऱ्या किली पॉल(Kili Paul)नं सोशल मीडिया(Social Media)वर धमाका उडवून दिलाय. इन्स्टाग्राम(Instagram)वर त्याचे व्हिडिओ खूप आवडीनं पाहिले जातायत. तो अनेकदा बॉलिवूड (Bollywood) गाण्यांवर लिपसिंक (Lipsync) करताना दिसतो. आता त्यानं रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या गाण्यावर लिपसिंक केलंय. त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral) होतोय.

सेलिब्रिटीही शेअर करतात व्हिडिओ व्हिडिओमध्ये किली पॉल रणबीर कपूरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातलं ‘चन्ना मेरेया’ गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे. त्यानंही रणबीर कपूरसारखा डान्स केलाय. या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर केलं जातंय. किली पॉलच्या लोकप्रियतेचा अंदाज अशा प्रकारे लावला जाऊ शकतो, की अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तिचे व्हिडिओ शेअर करतात. अलीकडेच त्यानं ‘डान्स मेरी रानी’ गाण्यावर धमाकेदार डान्स केला, जो गुरू रंधावा आणि नोरा फतेही यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

‘हिंदी गाणी ऐकल्यावर छान वाटतं’ काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान किली पॉलनं सांगितलं होतं, की त्याला लहानपणापासूनच बॉलिवूड गाणी आवडतात. यासोबतच त्यानं हेही सांगितलं होतं, की त्याच्या गावात वीज नाही, त्यामुळे मोबाइल चार्ज करण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागतं. यानंतर तो मोबाइलवरून व्हिडिओ बनवतो आणि इन्स्टाग्रामवर शेअर करतो. किली पॉलनं सांगितलं, की मला बॉलिवूड चित्रपट आवडतात. कारण मी भारतीय चित्रपट बघत मोठा झालोय. मी बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड गाणी ऐकत आहे. त्यामुळे माझी हिंदी गाण्यांची आवड वाढली. हिंदी गाणी ऐकल्यावर खूप छान वाटतं.

‘हिंदी समजत नाही, पण…’ किली पॉलची बहीण नीमा पॉल म्हणाली, की मला हिंदी समजत नाही, पण काही शब्द समजतात जसे दिल म्हणजे हृदय. किली पॉल म्हणतो, माझ्याकडे फोन आहे. मी इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग रील्स पाहतो. भारतात काय ट्रेंड होतोयते मी YouTubeवर पाहतो. मी तिथली गाणी आणि डान्स व्हिडिओ पाहतो.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

सायकलवर जाऊन चार्ज करतो मोबाइल किली पॉल आणि नीमा टांझानियाच्या एका ग्रामीण भागात राहतात. तिथं वीज नाही. किली सांगतो, की तो फोन चार्ज करण्यासाठी दुसऱ्या गावात जातो. ते अंतर त्याच्या घरापासून 8 ते 10 किलोमीटर दूर आहे. त्याच्याकडे एक मोटरसायकल आहे. त्यावरून तो मोबाइल चार्ज करण्यासाठी जातो.

Varun Dhawanनं असं काहीसं केलं नववर्षाचं स्वागत, चाहत्यांकडून कौतुक, पाहा Photo

Bigg Boss 15 : बॉबी देओलनं साकारली होती धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका, वडिलांनी सांगितला किस्सा

गौतम किचलूनं गोड बातमी सांगितल्यानंतर काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस Photo

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें