प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा नको तो व्हिडीओ व्हायरल, मोठा खुलासा समोर

Private video viral: प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबत नको तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, व्हिडीओबद्दल खुद्द तिनेच केला मोठा खुलासा... सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा नको तो व्हिडीओ व्हायरल, मोठा खुलासा समोर
| Updated on: Oct 27, 2024 | 10:19 AM

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे सर्वत्र खळबळ देखील माजते. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींचे नको ते फोटो, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. आता एका प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याच आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. यावर सोशल मीडिया स्टारने मोठं वक्तव्य देखील केलं आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडिया स्टार आणि तिच्या व्हायरल व्हिडीओ चर्चा रंगली आहे.

ज्या सोशल मीडिया स्टारचा एमएमएस व्हायरल करण्यात आला आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तानी सोशल मीडिया आणि टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मिनाहिल मलिक हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. वाद वाढत असल्याचं पाहून सोशल मीडिया स्टारने यावर प्रतिक्रिया दिली असून व्हिडिओबाबत खुलासाही केला आहे. यासोबतच तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

 

 

मिनाहिल मलिक प्रचंड प्रसिद्ध आणि लोकप्रिय सोशल मीडिया स्चार आहे. सोशल मीडियावर एक MMS व्हायरल होत आहे आणि तो MMS मिनाहिल मलिक हिचा असल्याचा दावा केला जात आहे. मिनाहिलच्या व्हायरल व्हिडिओची माहिती समोर येताच व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

मिनाहिल हिने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ फेक असल्याचं सांगत तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओमध्ये मिनाहिल तिच्या मित्रासोबत असल्याचा दावा करण्यात आला. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही… असा खुलासा करत मिनाहिल हिने व्हिडिओबाबत तक्रार दाखल केली आहे.

 

 

MMS व्हायरल झाल्यानंतर मिनाहिल म्हणाली, ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ फेक आहे. याबाबत मी तक्रार देखील दाखल केली आहे आणि असं कृत्य करणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल. ज्याच्या मनात महिलांबद्दल आदर नाही अशीत व्यक्ती असं कृत्य करु शकते… ज्याच्या घरी आई – बहीण नाही…’ असं म्हणत मिनाहिल हिने चाहत्यांकडून मदतीची विनंती केली आहे.

घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडिया स्टारचे कुटुंबिय देखील चिंतेत आहे. तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत असं काही होत असेल तर तात्काळ रिपोर्ट करा… असं देखील मिनाहिल म्हणाली. मिळालेल्या माहितीनुसार, मिनाहिल खान पाकिस्तान येथील कराची याठिकाणी राहणारी आहे. टिकटॉकवर मिनाहिल हिचे 18 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.