
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होती आणि ती तिचे बरेच हॉट फोटो शेअर करायची. मात्र काही दिवसांपूर्वी पलक सोशल मीडियावरून गायब झाली होती. पलकनं तिचं अकाऊंट बंद केलं होतं. मात्र, आता पलकने सोशल मीडियावर पुनरागमन केले आहे.

कमबॅकमध्ये पलक अधिक हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसली आहे. तिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये पलकनं हॉट ड्रेस कॅरी केला आहे.

पलकच्या या फोटोंवर चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. याशिवाय त्याची आई श्वेता तिवारीनंही या पोस्टवर कमेंट केली आहे. श्वेतानं लिहिलं, Oh my Girl.

पलक आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘रोजी: द सैफरन चैप्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. विवेक ओबरॉय हा चित्रपट तयार करतोय.

काही दिवसांपूर्वी पलकनं आईच्या वैयक्तिक संघर्षाबद्दल सांगितलं होतं की, मला माझ्या आईचा अभिमान आहे. माझी आई पालक-शिक्षकांच्या मीटींगला यायची तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा.

दुसरीकडे, श्वेताच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर ती 'मेरे डॉड की दुल्हन' मध्ये दिसली होती. ही मालिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस आली होती. सध्या ती केपटाऊनमध्ये आहे आणि 'खतरों के खिलाड़ी 11' चं शूटिंगकरतेय. श्वेता येथे बर्याच स्टंट्स करताना दिसत आहे.