Panchayat Season 5 Update: ‘पंचायत 5’ ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची निराशा; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा
पंचायत सिरीजचे चारही सिझन सुपरहीट ठरले. आता प्रेक्षक पंचायतच्या पाचव्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता पंचायतच्या 5 व्या सिझनबाबत एक मोठी बातमी समोर आली असून निर्मात्यांनी प्रेक्षकांना चांगलाच धक्का दिला आहे.

Panchayat Season 5 Update: ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा अनेक वेबसिरीज आहेत ज्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. ओटीटीवरील सर्वात गाजलेल्या वेबसिरीजपैकी एक म्हणजे पंचायत. पंचायत सिरीजचे चारही सिझन सुपरहीट ठरले. आता प्रेक्षक पंचायतच्या पाचव्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता पंचायतच्या 5 व्या सिझनबाबत एक मोठी बातमी समोर आली असून निर्मात्यांनी प्रेक्षकांना चांगलाच धक्का दिला आहे.
‘पंचायत 5’ लांबणाीवर, निर्मात्यांचा प्रेक्षकांना धक्का!
‘पंचायत’ सिरीजचे चार सीझन प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्माते यावर्षी, म्हणजेच 2026मध्ये पाचवा सीझन आणतील असे मानले जात होते. मात्र आता प्रेक्षकांना पंचायतच्या पाचव्या सिझनसाठी वाट पाहावी लागणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. कारण, ‘पंचायत 5’ 2026 मध्ये प्रदर्शित होणार नाही. प्राईम व्हिडिओने १५ नोव्हेंबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली.
प्राईम व्हिडिओने याबाबत दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहिल्या फोटोवर पंचायत सीझन ५ यावर्षी प्रदर्शित होणार नाही, असं लिहलं आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये सिरीजमधील बनारस हे पात्र हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. हे दोन फोटो शेअर करताना प्राईमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्हाला कळवण्यास खेद वाटतो की, ‘पंचायत’चा पुढचा सीझन थांबवण्यात आला आहे.”
‘सिझन 5’ मध्ये पाहायला मिळणार नवं राजकारण!
दरम्यान, पंचायतचा चौथा सीझन एका रोमांचक वळणावर संपला होता. चारही सीझनमध्ये सेक्रेटरीच्या भूमिकेत जितेंद्र कुमार, प्रधानाच्या भूमिकेत रघुबीर यादव, तसेच सन्विका, फैसल मलिक, दुर्गेश कुमार, नीना गुप्ता आणि चंदन रॉय यांसारख्या कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. चौथा सीझन एका रोमांचक वळणावर संपला.
फुलेरा गावाच्या उपप्रधानाची भूमिका साकारणारे फैसल मलिक आता आमदारकीची निवडणूक लढवत आहेत आणि बनारकस यांची पत्नी नवीन प्रधान बनली आहे. त्यामुळे, फुलेरा गावाची कथा पुढे कुठे जाईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. निर्माते यावर्षी पाचवा सीझन प्रदर्शित करतील अशी अपेक्षा होती, परंतु आता हे निश्चित झाले आहे की पाचवा सीझन यावर्षी येणार नाही.