AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामान्यांना धक्काबुक्की अन् ही मात्र..; लालबागचा राजाच्या चरणांजवळून परिणीती चोप्राचा व्हिडीओ कॉल, चिडले नेटकरी

Lalbaughcha Raja: एकीकडे सर्वसामान्यांना धक्काबुक्की होत असताना परिणीती मात्र निवांत पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सामान्यांना धक्काबुक्की अन् ही मात्र..; लालबागचा राजाच्या चरणांजवळून परिणीती चोप्राचा व्हिडीओ कॉल, चिडले नेटकरी
परिणीती चोप्राImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 8:56 AM
Share

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सवाच्या काळात सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राने 21 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत पती आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा उपस्थित नव्हते. मात्र, परिणीतीने बाप्पाच्या दर्शनाचा हा खास क्षण पतीसोबत शेअर करण्यासाठी त्यांना थेट व्हिडीओ कॉल केला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. परिणीती गुलाबी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचली होती. तिने बाप्पासमोर काही वेळ थांबून दर्शन घेतलं. त्यानंतर तिने राघव चड्ढांना व्हिडीओ कॉल केला आणि त्यांनाही बाप्पाचं दर्शन घडवलं. एका बाजूला सर्वसामान्यांना धक्काबुक्की होत असताना, सेलिब्रिटींना मात्र निवांत दर्शन मिळतं, यावरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

परिणीतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः व्हीआयपी दर्शनाच्या मुद्द्यावरून काही नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. सर्वसामान्य भाविकांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगेत तासन्‌तास उभं राहावं लागतं, तर सेलिब्रिटींना तुलनेने अधिक वेळ आणि सुविधा मिळतात, असं नेटकरी म्हणाले. ‘लालबागचा राजा हा फक्त सेलिब्रिटींचा गणपती आहे, सर्वसामान्यांसाठी नाही’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘कोणी तिलासुद्धा सर्वसामान्यांप्रमाणे धक्काबुक्की करू शकेल का’, असा खोचक सवाल दुसऱ्या युजरने केला. इतकी गर्दी असताना व्हिडीओ कॉलवर बोलतेय, हे चुकीचं आहे.. असंही काहींनी म्हटलं आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

परिणीतीच्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या दरबारातील व्हीआयपी व्यवस्थेवर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी परिणीतीपेक्षा मंडपातील व्यवस्थेवर अधिक प्रश्न उपस्थित केले. सेलिब्रिटींना विशेष सुविधा का दिल्या जातात, तर सामान्य भाविकांना कमी वेळेत दर्शन घेऊन पुढे का जावं लागतं, असा मुद्दा त्यांनी मांडला.

परिणीती चोप्राने 24 सप्टेंबर 2023 रोजी राघव चड्ढाशी लग्न केलं असून 19 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला.

Follow Us
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...