AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt: VIP असूनही लालबागच्या राजाच्या दरबारात बायकोसाठी संजय दत्तला करावं लागलं असं काम

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्तने पत्नी मान्यतासह लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. यावेळचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गर्दी वाढत असताना संजय मान्यताच्या अगदी जवळ राहिला. चाहत्यांची मोठी गर्दी, कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांचा घोळका असतानाही त्याने मान्यताला सुरक्षितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

Sanjay Dutt: VIP असूनही लालबागच्या राजाच्या दरबारात बायकोसाठी संजय दत्तला करावं लागलं असं काम
संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यताImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 8:34 AM
Share

Sanjay Dutt: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडपात गणेशोत्सवानिमित्त बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळत आहे. अभिनेता संजय दत्त याने पत्नी मान्यता दत्तसोबत मंगळवारी 22 सप्टेंबरला लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी गर्दीतून मार्ग काढताना संजय दत्त पत्नी मान्यताची विशेष काळजी घेताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. संजय दत्तने यावेळी नारंगी रंगाचा कुर्ता परिधान केला होता, तर मान्यता गुलाबी रंगाच्या पारंपरिक पोशाखात दिसली. बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याने संजयसोबत सुरक्षारक्षकांचाही बंदोबस्त होता. मंडपाकडे जाताना संजय सतत मान्यताच्या जवळ राहिला. गर्दीत तिची गैरसोय होऊ नये, याची तो काळजी घेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दर्शनादरम्यान संजय दत्त बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाला. त्यानंतर त्याने स्वतःच्या आणि मान्यताच्या कपाळावर टिळा लावला. बाप्पाच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याने लालबागच्या राजावरील आपली श्रद्धाही व्यक्त केली. पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घेता आलं, हे आपलं भाग्य असल्याचं त्याने सांगितलं. दरवर्षी बाप्पाने आपल्याला दर्शनासाठी बोलवावं आणि आपण येत राहावं, अशी इच्छा असल्याचंही संजयने म्हटलं.

पहा व्हिडीओ-

संजय दत्तच्या लालबागच्या राजाच्या दर्शनातील आणखी एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. संजय दत्त आणि मान्यता दर्शनासाठी मंडपाच्या दिशेने जात असताना अनन्या पांडे आणि तिचे वडील चंकी पांडे दर्शन घेऊन बाहेर पडत होते. याचवेळी दोन्ही कुटुंबांची क्षणिक भेट झाली. या सेलिब्रिटी क्रॉसओव्हरचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ-

यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. संजय दत्तच्या आधी शाहरुख खान पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. रणवीर सिंहनेही पारंपरिक वेशात लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुंबईच्या गणेशोत्सवातील लालबागचा राजा हे श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. सर्वसामान्य भक्तांपासून बॉलिवूडच्या दिग्गजांपर्यंत अनेक जण दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. यंदाही सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे लालबागचा राजाचा दरबार चर्चेत आहे.

Follow Us
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...