अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीचे सुरू आहे अफेअर?, पहिली पत्नी पायल हिनेच…

अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. मात्र, दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉसमध्ये दाखल झाल्याने लोक त्याला टार्गेट करताना दिसले. अरमान मलिककडे मोठी संपत्ती आहे.

अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीचे सुरू आहे अफेअर?, पहिली पत्नी पायल हिनेच...
Kritika Malik
| Updated on: Jul 22, 2024 | 2:21 PM

अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाला. मात्र, अरमानची पहिली पत्नी पायल मलिक ही काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीये. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींना लोक सोशल मीडियावर सतत टार्गेट करताना दिसत आहेत. आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही आहे. विशेष म्हणजे कृतिका मलिक ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. 

सध्या सोशल मीडियावर कृतिका मलिक हिचा एक व्हिडीओ व्हायरल केला जातोय. हेच नाहीतर कृतिका मलिक हिचे बाहेर अफेअर असल्याचाही दावा केला जातोय. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीसोबत डान्स करताना कृतिका मलिक ही दिसत आहे आणि याच्यासोबत तिचे अफेअर सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. 

आता यावर उत्तर देताना पायल मलिक ही दिसली. पायल म्हणाली की, कृतिका मलिकचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि सांगितले जातंय की, त्या व्यक्तीसोबत तिचे अफेअर आहे, तो व्यक्ती आमच्या तिघांचाही खूप जास्त चांगला मित्र आहे. फक्त मित्रच नाहीतर आमचे फॅमिली रिलेशन आहे. ते आमच्या घरी येऊन राहतात. 

व्हिडीओमध्ये जो व्यक्ती दिसत आहे, ते हैद्राबादचे आहेत. त्यांचे आणि आमचे फॅमिली रिलेशन हे आजपासून नाहीतर कित्येक वर्षांपासून आहे. यामुळे अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी बोलणे बंद करा असेही पायल मलिक हिने म्हटले आहे. फक्त कृतिका मलिकच नाहीतर पायल हिच्याबद्दलही गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. 

कृतिका मलिक आणि पायल मलिक या कोट्यवधी संपत्तीचा मालक आहेत. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अरमान मलिक याने म्हटले होते की, तो 200 कोटी संपत्तीचा मालक आहे. पायल मलिक ही कृतिका मलिक हिच्या आईच्या घरी दिल्लीला गेली होती. यावेळी कृतिकाची आई पायलला घटस्फोट न घेण्याचा सल्ला देखील देताना दिसली.