AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूरच्या होणाऱ्या दिराला डेट करतंय सारा अली खान? ‘ते’ फोटो व्हायरल, सैफची लेक महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत..

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सारा अली खान सध्या तूफान चर्चेत आहे. सारा अली खानचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यानंतर एक चर्चा रंगलीये.

जान्हवी कपूरच्या होणाऱ्या दिराला डेट करतंय सारा अली खान? 'ते' फोटो व्हायरल, सैफची लेक महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत..
sara ali khan
| Updated on: May 04, 2024 | 7:38 PM
Share

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर सारा अली खान हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे साराचे चित्रपट चांगलीच धमाल देखील करत आहेत. सारा अली खान सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही सारा अली खान दिसते. मध्यंतरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या.

आता थेट सारा अली खान ही वीर पहाडिया याला डेट करत असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीर कुमार शिंदे यांचा नातू आहे आणि शिखर पहाडिया याचा भाऊ. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे एकमेकांना डेट करत आहेत, मात्र, त्यांनी त्यांचे रिलेशन अजून ऑफिशियल केले नाहीये.

म्हणजेच काय तर जान्हवी कपूर आणि सारा अली खान या सख्या दोन भावांना डेट करत आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. हेच नाही तर शिखर पहाडिया याच्या नावाचे एक पेंडेट देखील जान्हवी कपूरने गळ्यात घातले आहे. जान्हवी कपूर आणि सारा अली खान हा चांगल्या मैत्रिणी देखील आहेत.

सारा अली खान आणि वीर पहाडिया हे लंडनमध्ये धमाल करताना दिसत आहेत. आता सारा अली खान हिच्या लंडन व्हेकेशनचे काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत. यामध्ये सारा अली खान आणि वीर पहाडिया हे दिसत आहेत. हेच नाही तर अनंत अंबानी याच्या प्री वेटिंग फंक्शनमध्ये सारा अली खान आणि वीर पहाडिया हे धमाल करताना दिसले.

अनंत आणि राधिकाच्या प्री वेटिंगमध्ये सारा अली खान आणि वीर पहाडिया यांनी डान्स देखील केला होता. मध्यंतरी चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे लवकरच लग्न होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिरूपती बालाजी मंदिरात देखील जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकसोबत पोहचले होते. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना