एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव; ‘फुले’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहिलात का?

'स्कॅम 1992' या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता प्रतीक गांधी आता एका अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत अभिनेता राजकुमार रावची पत्नी पत्रलेखासुद्धा मुख्य भूमिकेत आहे.

एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव; ‘फुले’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहिलात का?
Pratik Gandhi as jotiba phule and Patralekhaa as savitribai phule
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2025 | 3:38 PM

‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर हा चित्रपट आधारित आहे. येत्या 11 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे.

‘फुले’ – परिवर्तनाची कहाणी

महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जाति निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे. महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी उभ्या केलेल्या चळवळींचा आजही आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे.

दिग्दर्शक आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण

या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रं जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

उत्कृष्ट निर्मिती आणि भव्य प्रस्तुती

‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे आहेत. तर सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा, रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले’ हा हिंदी चित्रपट जगभरात 11 एप्रिल 2025 प्रदर्शित होणार आहे.