AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून जाऊन लग्न केले, 9 वर्षात घटस्फोट, दुसरं लग्न करण्याआधीच प्रेग्नंट झाली टॉप एक्ट्रेस

अशी एक अभिनेत्री जी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीने वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून जाऊन लग्न केलं. मात्र 9 वर्षात घटस्फोट झाला. मात्र दुसरं लग्न करण्याआधीच ती प्रेग्नंट झाली. कोण आहे ही अभिनेत्री जी एका भूमिकेमुळे रातोरात स्टार झाली.

वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून जाऊन लग्न केले, 9 वर्षात घटस्फोट, दुसरं लग्न करण्याआधीच प्रेग्नंट झाली टॉप एक्ट्रेस
Pooja BanerjeeImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 12:33 PM
Share
बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्रीत अफेअर, घटस्फोट, लग्न या सर्व गोष्टी अगदीच सामान्य आहे. त्यामुळे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री कायम चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. जिने वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून जाऊन लग्न केलं. मात्र 9 वर्षात घटस्फोट झाला.मात्र दुसरं लग्न करण्याआधीच प्रेग्नंट झाली. त्यामुळे या अभिनेत्रीची कायमच चर्चा होताना दिसते.
38 वर्षीय टॉप अभिनेत्रीने केलं दोनदा लग्न
अनेक ही अभिनेत्री टीव्ही शो, हिंदी, बंगाली आणि मराठी चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम केलेल्या या 38 वर्षीय टॉप अभिनेत्रीने दोनदा लग्न केले आहे. तिला एक मुलगा देखील आहे. तिने दुसऱ्यांदा टीव्ही अभिनेत्याशी लग्न केले आहे. लग्नापूर्वी तिने सुमारे 3 वर्षे त्या अभिनेत्याला डेट केलं अन् लग्नाआधी प्रेग्नंट झाली. ही अभिनेत्री म्हणजे ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत देवी पार्वतीची आणि ‘जग जननी माँ वैष्णो देवी’ या मालिकेत माता वैष्णो देवीची भूमिका साकारणारी पूजा बॅनर्जीबद्दल बोलत आहोत.
अभिनेत्याशी गुपचूप लग्न
पूजा बॅनर्जीने ‘रोडीज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. तिने बंगाली, मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सध्या 38 वर्षांची आहे आणि तिला एक मुलगा आहे.  पूजा बॅनर्जीने 2020 मध्ये अभिनेता कुणाल वर्माशी गुपचूप लग्न केले. तिने ही माहिती तिच्या इंस्टाग्राम पोस्ट दरम्यान दिली. पूजा बॅनर्जीने एप्रिल 2020 मध्ये दुर्गापूजेदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता आणि तो शेअर करताना तिने सांगितले होते की तिने दीड महिन्यांपूर्वीच कुणालसोबत लग्न केलं आहे.
लग्नाआधीच प्रेग्नंट होती अभिनेत्री
पूजा बॅनर्जीने तिच्या पोस्टमध्ये दावा केला होता की ती एक मोठं लग्न करणार होती, परंतु करोनामधील लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. एका वृत्तानुसार लग्नापूर्वी पूजा आणि कुणालने 2017 मध्ये साखरपुडा केला होता. पूजा बॅनर्जीने 2020 मध्ये एका मुलाला जन्म दिला. लग्नाआधीच ती  प्रेग्नंट राहिली होती. पूजा तिच्या मुलासह आणि पतीसह आनंदी जीवन जगत आहे.
View this post on Instagram

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)

पूजा बॅनर्जी 15 वर्षांची असताना ती घरातून पळून गेली. 2004 मध्ये तिने तिचा प्रियकर अरुणॉय चक्रवर्तीशी लग्न केले. पूजा आणि अरुणॉय 9 वर्षे एकत्र राहिले आणि 2013 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
एका भूमिकेमुळे रातोरात स्टार
अरुनॉयसोबत घटस्फोट घेतल्यानंतर पूजा बॅनर्जीने तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले. या काळात तिला ‘देवो के देव महादेव’ मध्ये पार्वतीची भूमिका ऑफर करण्यात आली. ही भूमिका साकारताच ती एका रात्रीत स्टार बनली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिची कुणालशी ओळख झाली. ती आज एक टॉप अभिनेत्री आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.