Pooja Birari : …म्हणून पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरनं लग्नानंतर थाटला वेगळा संसार, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

Pooja Birari : पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले होते. आता अभिनेत्रीनं एका मुलाखतीत लग्नानंतर वेगळं राहण्याचं कारण सांगितलं आहे.

Pooja Birari : ...म्हणून पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरनं लग्नानंतर थाटला वेगळा संसार, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
| Updated on: Oct 06, 2026 | 5:06 PM

मराठी अभिनेत्री पूजा बिरारीनं काही महिन्यांपूर्वी सोहमी बांदेकरसोबत लग्नगाठ बांधली. पूजा आणि सोहमच्या लग्नापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा बांदेकर म्हणालेल्या की, ‘मी त्याला लग्नानंतर वेगळं राहायला सांगितलं आहे‘ अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत पूजा बिरारीनंही वेगळं राहण्याबद्दल भाष्य केलं आहे.

काय म्हणाली पूजा बिरारी?

Loading...

‘इट्स मज्जा‘ला दिलेल्या मुलाखतीत पूजा बिरारी म्हणाली की, ‘मी आणि सोहम मालाडला असतो आणि आई–बाबा पवईला असतात. पण, आम्ही चौघंही वर्किंग असल्यामुळे भेटायचं कधी ते आम्ही ठरवून घेतो. त्यामुळे ती भेटायची मज्जा असते. आई बाबांना भेटण्याची आठवडाभर उत्सुकता असते. ते येणार म्हटल्यावर काहीतरी खायला करेन, असं मी म्हणते. पण सगळे म्हणतात आपण एक दिवस आराम करू किंवा कुठेतरी फिरायला जाऊ.’

‘आम्ही जरी कामानिमित्त वेगळं राहत असलो किंवा ठरवून जरी वेगळं राहत असलो तरी ते जमतंय आणि ते उत्तम आहे, असं मला वाटतं.’ असं पूजा म्हणाली.

बांदेकरांनी सून म्हटल्यावर सोहम प्रोडक्शनमध्ये सहज काम मिळेल, असं अनेकदा पूजाबद्दल म्हटलं गेलं आहे. यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘हे मला माझ्या सेटवरही जाणवलेली गोष्ट आहे. ‘तुला आता काय टेन्शन?’ असं मी ऐकलंय. पण प्रोडक्शन आणि कलाकार या दोन बाजू आहेत. आर्टिस्टच्या बाजूने त्यांना असं वाटू शकतं की हिला काय लगेच काम मिळेल. पण प्रोडक्शनच्या बाजूने प्रोडक्शनचं असं ठाम म्हणणं असतं की, ‘हे ठरवणारे आम्ही कोणीच नसतो’. ते जुळून येणंही तेवढंच गरजेचं असतं. त्याच चॅनलचंही काहीतरी म्हणणं असतं. ते कॅरेक्टर तसं आहे आणि त्यात कोणाला कास्ट करायचं हे सांगणारे आम्ही कोणीच नाही. पण हा एक समज असतो की प्रोडक्शन आहे तर हिला लगेच कास्ट केलं जाईल.’

‘जर उद्या कधी मला आमच्याच प्रोडक्शनच्या मालिकेची ऑडिशन द्यायची जरी असेल तरी आमच्यात ते इतकं क्लिअर आहे की मी प्रोफेशनली जाऊन ती ऑडिशन देईन. मला त्या ऑडिशनलाही पोटात गोळा येणारच आहे. होतंय ना नीट? जमतंय ना? असं टेन्शन येणारे. मला हेही माहितीये की त्या कामासाठी एक साधं ऑडिशन जरी असली तरी मला झुकतं माप मिळणार नाही. कारण त्यांच्यावरही ती जबाबदारी आहे. सोबतच आपल्या प्रोडक्शनचं कोणतंही काम खराब व्हावं असं मला अजिबातच नकोय. जर मी तिथे योग्य असेन तर ठिके पण जर मी योग्य नसेन तर तिथेच काय कुठेही मला ते मिळणार नाही. बळजबरी कुठेच होऊ शकत नाही आणि झालं जरी तरी त्याचा एक शेवट असतोच. आपण आरशात बघू तेव्हा स्वत:ला उत्तरं द्यायचीच आहेतच. आमच्या घरात आम्ही याबाबतीत खूप प्रोफेशनल आहोत. एक मात्र आहे की मला मार्गदर्शन खूप छान मिळेल. त्याबाबतीत मी नशिबवान आहे.’ असंही पूजा म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us