OTT वर होणार मोठा धमाका, मिर्झापूर 3 सह ‘या’ सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

२०२३ हे वर्ष सीरिज प्रेमींसाठी असणार धमाकेदार, मिर्झापूर 3 सोबत 'या' सीरिज करणार प्रेक्षकांना थक्क. ओटीटीवर धमका करणार या सीरिज

OTT वर होणार मोठा  धमाका, मिर्झापूर 3 सह या सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस
OTT वर होणार मोठा धमाका, मिर्झापूर 3 सह 'या' सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस
| Updated on: Jan 17, 2023 | 11:37 AM

मुंबई : 2023 हे वर्ष सीरिज प्रेमींसाठी खास आणि धमाकेदार असणार आहे. कारण यंदाच्या वर्षी अनेक वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. २०२३ अनेक प्रसिद्ध सीरिजचे सिक्वल प्रदर्शित होणार आहेत. मिर्झापूर, द फॅमिली मॅन आणि आर्या या सीरिजने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंज केलं. आता मिर्झापूर 3, आर्या 3, द फॅमिली मॅन 3 आणि मेड इन हेवन पार्ट 2 प्रदर्शित होणार आहे.

ओटीटीवर धमका करणार या सीरिज

द फॅमिली मॅन 3 – ओटीटी प्लॅटफॉर्मवर द फॅमिली मॅन सीरिजने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सीरिजमध्ये कॉमन मॅनची अनकॉमन गोष्ट सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. द फॅमिली मॅन सीरिजचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत, आता तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. सीरिजमधील अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या भन्नाट अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं.

मिर्झापूर 3 – लवकरच मिर्झापूर सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांच्या मनात सीरिजची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कालीन भैय्या आणि गुड्डू पंडीत यांच्यातील यांच्यामधील संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सीरिजच्या दोन भागांनंतर सीरिजच्या तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

आर्या 3 (Aarya 3)- अभिनेत्री सुष्मिता सेन स्टारर आर्या सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. आर्या सीरिजच्या तिसऱ्या भागात खुद्द सुष्मिता एका डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. आर्याचा वेगळा अंदाज पाहण्सासाठी चाहते उत्सुक आहे.

मेड इन हेवन 2 (Made in Heaven 2) : राजनीती, क्राईम, ड्रामा आणि सस्पेंस थ्रिलर अशा सर्व गोष्टींची मेजवानी असलेल्या मेड इन हेवन सीरिजने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता मेड इन हेवन सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यशस्वी ठरल्यानंतर चाहते दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us