‘प्राजक्ताकडून माफी मागून घेणे, राजकीय नेत्यांना विनोदाचं वावडं..; हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी स्पष्टच म्हणाले

अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे तिच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आल्याच्या घटनेमुळे. कार्यक्रमाच्या वादानंतर तिने स्वत:हूनच तिथे जाणं रद्द केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ताच्या बाबतीत काहीना काही वाद घडतानाच दिसत आहे. आता सर्व घटनांवर हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्ताकडून माफी मागून घेणे, राजकीय नेत्यांना विनोदाचं वावडं..; हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी स्पष्टच म्हणाले
| Updated on: Feb 27, 2025 | 2:13 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे तिच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आल्याच्या घटनेमुळे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी अभिनेत्रीच्या सादरीकरणाला विरोध दर्शवला होता.यानंतर प्राजक्ता माळीने स्वत: व्हिडीओ शेअर करत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. माजी विश्वस्तांच्या आक्षेपानंतरही महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेणार होते. पण, आता स्वत: प्राजक्ताने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वर कार्यक्रमाचा मुद्दा चर्चेत 

प्राजक्ता माळीने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत सर्वांना माहिती दिली होती. ती म्हणाली होती, “पहिल्यापासून या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं. कारण, मंदिराचं प्रांगण, तेथील क्षेत्रफळ, तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी सुद्धा सोशल मीडियावर या कार्यक्रमाबाबत अजिबात माहिती दिली नव्हती आणि प्रसिद्धी सुद्धा दिली नव्हती. पण, काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली त्यामुळे आता अवास्थव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्याचमुळे मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून हा निर्णय घेतेय. कमिंटमेंट आहे त्यामुळे कार्यक्रम होईल. माझे सहकलाकार तो कार्यक्रम सादर करतील पण माझ्याशिवाय…” असं म्हणत तिने तिची बाजू मांडली होती.

हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही प्रतिक्रिया दिली

आता याच संदर्भात हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सचिन गोस्वामींनी आगामी ‘चिकी चिकी बुबुम बुम’ सिनेमाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली .त्या मुलाखती दरम्यान त्यांनी सध्याच्या विनोदाचं वास्तवही समोर ठेवलं. ते म्हणाले की, “विनोदाची स्थिती राजकीय पातळीवर प्रत्येक टप्प्यात अशीच होती. मी गेली 30 वर्ष पाहतोय की, राजकीय नेत्यांना कधीच विनोदाचं वावडं नव्हतं. त्यांच्या अनुयायांनाच जास्त वावडं आहे. अनुयायांचीच निष्ठेची एक स्पर्धा लागली आहे की, माझ्या नेत्याला अमुक बोलल्यावर त्या नेत्याबद्दल निष्ठा व्यक्त करण्यासाठी ते रिअॅक्ट होतात.” असं म्हणत त्यांनी एकंदरीतच राजकीय वातावरणावर बोट ठेवलं.

प्राजक्ताकडून माफी मागून घेणे…

पुढे ते म्हणाले, “मुळात सर्व राजकीय नेते जे आहेत ना, ते नेहमीच आमच्याशी आपुलकीने आणि मोकळेपणाने वागतात. सर्वच राजकीय पक्षाचे नेते खूप छान वागतात. हास्यजत्रेच्या बाबतीत आमचा अनुभव आहे. पण अनुयायांचं काही सांगता येत नाही.विविध गट जे आहेत ना त्याचं इंटरेस्ट फार सोपे असतात. म्हणजे तुम्ही तो विनोद केला तर तो त्यांना दुखावत नाही. पण तोच विनोद प्रसादने किंवा प्राजक्ताने केला तर त्यांचे इंटरेस्ट असतात की प्राजक्ताकडून माफी मागून घेणे. याशिवाय त्यांना एक बातमीही हवी असते. यामुळे या सर्व गोष्टींमधून विनोद असाच तावुनसुलाखून बाहेर पडलाय. आणि पुढेही असंच होईल. फक्त सावध राहायला लागतं. आम्ही आता सद्यस्थितीत विनोद करतोय म्हणून आम्हाला कठीण वाटतंय. पण याआधी पुलंना सुद्धा हाच त्रास झाला असेल. वपुंना सुद्धा हाच त्रास झाला असेल.” असं म्हणत प्राजक्तासोबत मागील काही दिवसांपासून घडत असेल्या गोष्टींचाही त्यांनी उल्लेख केला.