Sandeep Despande:आशिष शेलारांना रामदास आठवले चावलेत, भाजपविरोधात मनसेचा दारुगोळा, संदीप देशपांडे यांनी थेट निशाणा साधला
Sandeep Despande Criticized Aashish Shelar: काल शिवसेना-मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाली. तेव्हापासून मनसे आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. आशिष शेलार आणि मनसे नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक चकमक आणि कवितेतून टीका करण्यात येत आहे. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेलारांवर निशाणा साधला आहे.

Sandeep Despande Criticized Aashish Shelar: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युतीची बुधवारी घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता मनसे आणि भाजपमधील वाकयुद्ध रंगले आहे. एकमेकांविरोधात व्हिडिओ लावण्याची स्पर्धेला आता सुरुवात होण्याची शक्यता आहे. मनसे आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. मनसे नेते आणि आशिष शेलार यांच्यामध्ये सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. तर कवितेतून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शेलारांवर निशाणा साधला आहे.
भाजपवर मनसेचा निशाणा
काल ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पोस्टर लावली त्याला संदेश देत आहोत मराठीच अपमान सहन केला जाणार नाही तो मेसेज दिला आहे. उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद नाही. भारतीय जनता पक्षाने जे काही एआय जनरेटर माकडाने हे सगळ केलं आहे, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. हा विषय आताच आला कुठे, जाणीवपूर्वक भाजप हे उत्तर भारतीय आणि मराठी वाद तयार करत असून त्यांना उत्तर भारतीय मत हवी आहेत, असे देशपांडे म्हणाले.
दुसऱ्याकडे एक बोट दाखवता तेव्हा एक बोट त्यांच्याकडे आहेत. अदानी फॅमिलीसाठी त्यांची युती आहे. हॅपिनेस इंडेक्स मुंबईकरांचा किती आहे. जनता खुश असेल तर ती प्रगती असते. एक अटल सेतू बांधला पण रस्ते खड्ड्यात गेले आहेत. रोज उठून कोण जात अटल सेतूबरून, असा सवाल देशपांडे यांनी केला. दोन दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. गेली 25 वर्ष सत्तेत नव्हते का पहारेकरी म्हणून घेत होते ना ते काय झोपा काढत होते का, असा सवाल त्यांनी केला.
शेलारांवर टीकेची झोड
आशिष शेलारांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली. शेलार यांना पक्षात कोण विचारत नसल्याने त्यांना रामदास आठवले चावले आहेत असा टोला देशपांडे यांनी लगावला.सत्तेतील लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं अमित साटम यांचा मेव्हणा,शेलार यांचा भाऊ,दरेकर यांचे भाऊ हा आहेत. अजून पण लिस्ट निघेल. बात निकलेगी तो लंबी जाएगी, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.
अडाणीचा फॅमिलीसाठी महापालिका ताब्यात पाहिजे का हे पण सांगावं, असा टोला त्यांनी शेलारांना लगावला. कौतुक वाटलं म्हणून व्हिडिओ ट्विट केले. यांच्या डोक्यात हिरवा रंग आहे. आशिष कुरेशी ही मुंबईला लागलेली बुरशी आहेत. रझा अकादमीचा मोर्चा निघाला तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे होते. कोण आलं बाहेर, असा सवाल त्यांनी केला. नवाब मलिक यांच्या मांडीला मंडी लावून बसले ते काय आम्हाला शिकवता. नवाब मलिकांना सोडविण्याचे काम फडणवीस यांनीच केले. ज्या भुजबळ यांच्यावर आरोप केले त्यांना मंत्रिपद दिले. हसन मुश्रीफ त्यांनी घेतलं. किरीट सोमय्या गेले होते हातोडा घेऊन काय झालं त्याचं, असा सवाल देशपांडेंनी केला. अजूनही चर्चा सुरू आहे आज उद्या मध्ये यादी जाहीर होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
