Prarthana Behere : बाबा, तुमचं जाणं आम्हाला… वडिलांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, प्रार्थना बेहेरे भावुक होत म्हणतेय..

Prarthana Behere : मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या वडिलांच्या निधनाला आज एक पूर्ण झालं आहे. वडिलांच्या पहिल्या वर्षश्राद्धानिमित्त अभिनेत्रीने भावुक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. सध्या सर्वत्र प्रार्थना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

Prarthana Behere : बाबा, तुमचं जाणं आम्हाला... वडिलांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, प्रार्थना बेहेरे भावुक होत म्हणतेय..
Prarthana Behere
| Updated on: Nov 02, 2026 | 2:37 PM

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रार्थनाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता प्रार्थना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, दिवंगत वडिलांसाठी केलेल्या भावूक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र प्रार्थनाच्या पोस्टची चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, प्रार्थना हिच्या वडिलांच्या निधनाला एक वर्ष झालं आहे. वडिलांच्या पहिल्या वर्षश्राद्धानिमित्त अभिनेत्रीने भावुक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. वडिलांसोबत देखील प्रर्थना हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

वडिलांसोबत फोटो पोस्ट करत प्रार्थना बेहेरे म्हणते, ‘एक वर्ष झालं बाबा… पण मन आजही तुमची वाट पाहतंय. बाबा, तुमचं जाणं आम्हाला खूप काही शिकवून गेलं… पण तुमच्याशिवाय जगणं कधीच शिकवू शकलं नाही. तुमच्या आठवणी आमची ताकद आहेत, आणि तुमचे संस्कार आमची ओळख. तुम्ही दिसत नाही, पण प्रत्येक क्षणी आमच्यासोबत आहात. तुम्ही आमचं आभाळ होता, बाबा… आणि आभाळ कधीच हरवत नाही. तुमच्या पहिल्या वर्षश्राद्धानिमित्त विनम्र श्रद्धांजली. खूप आठवण येते बाबा…’, सध्या सर्वत्र प्रार्थनाची पोस्ट व्हायरल होत आहे.

Loading...

 

अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता स्वप्निल जोशी, अभिजीत खांडेकर, भूषण प्रधान अभिनेत्री मयुरी देशमुख, सुखदा खांडेकर यांनी प्रार्थनाच्या पोस्टवर केमेंट केल्या आहे. तर प्रार्थना हिच्या चाहत्यांनी देखील पोस्टवर कमेंट व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं निधन…

प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं 14 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं होतं. एका रस्ते अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले होते. वडिलांच्या निधनानंतर प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या. वडिलांच्या निधनाच्या दोन महिन्यानंतर प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत वडिलांबद्दल सांगितलं होतं. सध्या सर्वत्र प्रार्थना बेहेरे हिची चर्चा रंगली आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us