Prashant Damle : हे तुम्ही महापालिकेलाच विचारा…BMC ने दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवताच प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

Prashant Damle On Dia Mirza : दिया मिर्झाच्या प्रकरणावर मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Prashant Damle : हे तुम्ही महापालिकेलाच विचारा...BMC ने दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवताच प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Nov 02, 2026 | 4:52 PM

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (बीएमसी) अभिनेत्री दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा एका मोहिमेत समावेश केला आहे. मात्र, या मोहिमेत दिया मिर्झाच्या समावेशावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते अमित साटम यांनी प्रदूषणविरोधी मोहिमेत दिया मिर्झाच्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘दिवाळी कशी साजरी करायची हे आपल्याला दिया मिर्झाकडून शिकण्याची गरज नाही.’ अमित साटम यांच्या ट्विटर पोस्टनंतर बीएमसीने दिया मिर्झाची पोस्ट हटवली. त्यानंतर आता मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

Loading...

प्रशांत दामले यांची प्रतिक्रिया 

मुंबई महापालिकेत बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानची बैठक आयोजित करण्यात आलेली. यावेळी दिया मिर्झा प्रकरणाबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, ‘हे बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हा विषयच माहित नाही. मला ओढून ताणून या प्रकरणात घेऊ नका. महापालिकेच्या मी कुठल्याही पदावर नाही. त्यामुळे हा माझा विषय नाहीये. दिया मिर्झाचा व्हिडिओ का हटवला हे तुम्ही महापालिकेला विचारा. माझा काय संबंध? दिया मिर्झाचा व्हिडिओ होता, हेच मला माहित नाही.’

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिवाळीत फटाके आणि ध्वनी प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्याच्या मोहिमेत दिया मिर्झाचा समावेश केल्याबद्दल बीएमसीवर टीका केली आहे. अमित साटम म्हणाले, ‘दिवाळी कशी साजरी करायची हे आपल्याला दिया मिर्झाकडून शिकण्याची गरज नाही. आपल्या परंपरा आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत.’

बीएमसीनं दिया मिर्झाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये तिनं फटाक्यांच्या वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक सोशल मीडिया हँडल्सनी दिया मिर्झावर नाराजी व्यक्त केली. यानंतर भाजप नेते अमित साटम यांनी एक निवेदन जारी केलं.

इंडिया टीव्हीशी बोलताना मुंबईचे उपमहापौर संजय घाडी म्हणाले, ‘अमित साटम आमदार आहेत आणि कधीकधी त्यांच्या सूचना योग्य असतात, पण या प्रकरणात, एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्माच्या आधारावर विरोध करणं योग्य नाही. तो व्हिडिओ हटवण्यापूर्वी प्रशासनानं या प्रकरणाचा विचार करायला हवा होता. असे निर्णय महापौर, आमची समिती आणि आम्ही सर्वजण मिळून घेतो. अशा परिस्थितीत, मी प्रशासनाला आवाहन करेन आणि हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश देईन.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us