“जर खोटी माहिती देऊन…”, सावत्र भावाच्या आरोपानंतर प्रतीकची क्रिप्टीक पोस्ट, टोमणा मारत म्हणाला…

Prateik On Arya Babbar : राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर याने त्याचा सावत्र भाऊ आणि स्मिता पाटील यांचा मुलगा, प्रतीक बब्बरवर टीका केली होती. पैशांसाठी वडीलाचा वापर केल्याचा आरोपही त्याने केला होता. त्यानंतर प्रतीक बब्बर याने एक पोस्ट लिहीत...

जर खोटी माहिती देऊन..., सावत्र भावाच्या आरोपानंतर प्रतीकची क्रिप्टीक पोस्ट, टोमणा मारत म्हणाला...
प्रतीकचं आर्यला प्रत्युत्तर
Image Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 1:32 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांची मुलं आणि त्यांचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बर यांच्यातील वाद आता घरापुरता मर्यादित राहिला नसून तो चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज बब्बर यांचा मुलगा आर्य याने, राज बब्बर व स्मिता पाटील यांचा मुलगा , प्रतीक बब्बरवर टीका केली होती. “जेव्हा त्याचं (प्रतीक) करिअर अडचणीत असतं किंवा त्याचे खिसे रिकामे असतात, तेव्हा वडील (राज बब्बर) आठवतात. पण जेव्हा जाहीरपणे वडिलांचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा प्रतीक मागे हटतो” अशा शब्दांत त्याने, पर्तीक फक्त पैशांसाठी वडिलांचा ( राज बब्बर) यांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केा होता. विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीत आर्यने प्रतीकवर बरीच टीका करत त्याच्याबद्दल मनात पूर्वीसारखे प्रेम आणि आदर राहिला नसल्याचेही म्हटले होते. त्याच्या या विधानाची आणि बब्बर कुटुंबीयातील वादाची चर्चा पुन्हा सुरू झाली होती.

मात्र त्याच्या या विधानानंतर आता प्रतीकने इन्स्टाग्रामवरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे त्याने आर्य बब्बरला प्रत्युत्तर देत त्याच्यावर टीका केल्याचे बोलले जात आहे.

Loading...

प्रतीकचं आर्य बब्बरला प्रत्युत्तर

आर्य बब्बरची मुलाखत समोर आल्यानंतर काही दिवसांनी, प्रतीकने त्याची पत्नी प्रिया बॅनर्जीने शेअर केलेली एक पोस्ट पुन्हा शेअर केली. “जर चुकीच्या माहितीमुळे खर्च भागत असता, तर काही लोक अखेर यशस्वी झाले असते.” असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. यासोबतच प्रतीकने IYKYK (if you know you know) हा हॅशटॅगटही जोडला होता. मात्र या पोस्टमध्ये प्रतीकने आर्यचं सरळ नावं घेतलं नसलं तरी, त्याच्या आरोपांवरच, प्रतीकने हे उत्तर दिल्याची चर्चा आहे.

काय म्हणाला होता आर्य बब्बर ?

आर्य बब्बरने विकी लालवाणी याला मुलाखत दिली, तेव्हा तो या नात्यावर बोलला होता. “प्रतीकबद्दल माझ्या मनात नेहमीच भावासारखं प्रेम होतं, पण प्रतीकने अचानक आपल्या कुटुंबाशी संबंध तोडले, असं आर्य बब्बरने सांगितलं. त्याच्या म्हणण्यानुसार, पत्नीसोबतच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होताच, प्रतीकने आपल्या कुटुंबाशी संवाद साधणे बंद केलं, मेसेजचा रिप्लाय केला नाही” असा दावा आर्य बब्बरने केला. एवढंच नव्हे तर या मुलाखतीत आर्यने प्रतीकवर कडाडून हल्ला चढवला. ‘सोयीला प्राधान्य देणाऱ्या’ प्रतीकच्या वृत्तीवर त्याने टीकास्त्र सोडलं. तो म्हणाला की, “जेव्हा त्याचं (प्रतीक) करिअर अडचणीत असतं किंवा त्याचे खिसे रिकामे असतात, तेव्हा वडील (राज बब्बर) आठवतात. पण जेव्हा जाहीरपणे वडिलांचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा प्रतीक मागे हटतो.” असा आरोप आर्य याने केला होता.

राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्यासाठी खरेदी केलेल्या त्याच आलिशान घरात प्रतीक अजूनही राहतो, त्यावरूनही आर्यने प्रश्न उपस्थित केला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या सुखसोयी आणि ऐषारामाचा आनंद घेतो, पण सार्वजनिक ठिकाणी वडिलांचे नाव घ्यायला प्रतीकला आवडत नाही, अशी टीकाहील त्याने या मुलाखतीत प्रतीकवर केली होती. त्याला पॉकेटमनी आणि घराची गरज असते तेव्हाच त्याला वडिलांची आठवण येते, इतर वेळी नाही, असंही आर्य पुढे उपहासाने म्हणाला होता.

ही एक मोठी शोकांतिका असल्याचं म्हटलं. तो म्हणाला की, त्याचे वडील राज बब्बर यांनी आपल्या आई स्मितासाठी सर्वस्व पणाला लावले होते, अगदी आपल्या पहिल्या कुटुंबालाही सोडून दिलं. पण आज त्याच आईचा मुलगा, स्मिता पाटील यांचा मुलगा हा वडिलांना स्वीकारायला तयार नाही, असं म्हणत राज बब्बर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याच आर्यने मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं.

प्रतीक- राज बब्बर यांचं नातं का बिघडलं ?

प्रतीक आणि त्याचे वडील, राज बब्बर, यांचे संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिल्यांचं दिसून आलंत. अभिनेत्याच्या जन्मानंतर काही काळातच त्याची आई, अभिनेत्री स्मिता पाटील, यांचं निधन झाले. प्रतीक अनेक वर्षे आपल्या वडिलांच्या आणि राज बब्बर यांच्या पहिल्या कुटुंबाच्या सोबत राहिला. पण जेव्हा त्याने आपले नाव प्रतीक बब्बरवरून बदलून प्रतीक स्मिता पाटील ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या नात्यात कटुता आली, असं म्हटलं जातं. प्रतीकने दुसरं लग्न केले, तेव्हा त्याने वडिलांना किंवा त्यांच्या कुटुंबाला आमंत्रितही केलं नव्हतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us