
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब याची आज म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 रोजी पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. गेल्या वर्षी प्रथमेश आणि क्षितीजाने गेल्यावर्षी 24 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी प्रथमेश बायकोसह थायलंडला गेला आहे.
प्रथमेश-क्षिती पहिल्या वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त थायलंडला
गेल्याच वर्षी प्रथमेशने लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. सध्या त्याच्या बायकोसोबत थायलंडमध्ये पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी आणि सेकंड हनिमून एन्जॉय करत आहे. थायलंडमधील फुकेत येथे प्रथमेश क्षिती त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत. त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर मजेत वेळ घालवताना दिसत आहेत. चाहत्यांनीही त्याच्या फोटोंना भरभरून प्रेम दिलं आहे.
प्रथमेश आणि क्षितीजाच्या थायलंड ट्रिपचे फोटो
प्रथमेश आणि क्षितीजाच्या थायलंड ट्रिपचे फोटोंनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये थायलंडच्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर आणि हिरव्यागार निसर्गात बायकोसोबतचे फोटो टाकले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे, “तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा!” तर दुसऱ्याने म्हटलं आहे, “प्रथमेश दादा, तुमची जोडी असंच कायम राहो!”
वाघासोबतचा फोटो चांगलाच चर्चेत
या सर्व फोटोंमध्ये एक फोटो मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये प्रथमेश आणि क्षितीने थेट खऱ्याखुऱ्या वाघोबाच्या पुढ्यातच बसून फोटो काढला आहे. यावरही चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या थायलंडमधील फोटो चाहत्यांनाही फार आवडले आहेत. त्यांच्या जोडीला शुभेच्छा देताना अनेकांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाची प्रशंसा केली. आता प्रथमेशच्या पुढील चित्रपटांची आणि त्याच्या आयुष्यातील अशा खास क्षणांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत!
प्रथमेश आणि क्षितिजा यांची ओळख एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबतचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता आहे. ‘टाइमपास’, ‘टाइमपास 2’, आणि ‘उर्फी’ यासारख्या अनेक चित्रपटांमधून त्याने आपली खास ओळख निर्माण केली. आहे.