
बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने शुक्रवारी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाइन डेला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. प्रतीकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला. त्याच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पण अशातच त्याची पहिली पत्नी सान्या सागरने केलेली एक पोस्टही व्हायरल होत आहे.
प्रतिकच्या दुसऱ्या लग्नानंतर नेटकऱ्यांना सान्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता
सान्याने एकटेपणाची भावना दाटून आल्याचे भाव सांगणारी एक पोस्ट तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. प्रतिकची पहिली पत्नी असलेली ही सान्या सागर आहे तर कोण? घटस्फोटानंतर ती कुठे आहे आणि काय करतेय हे अनेकांना माहित नाही. पण प्रतिकच्या दुसऱ्या लग्नानंतर मात्र नेटकऱ्यांना सान्याबद्दल जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता दिसून येत आहे.
दोघांचा संसार 4 वर्षांचाच
प्रतिकचे पहिले लग्न सान्या सागरशी झाले होते. सान्या सागर ही एका राजकारण्याची मुलगी आहे आणि ती चित्रपटसृष्टीबाहेरील जगातली आहे. 2019 मध्ये त्यांचे लग्न झाले, पण अवघ्या 4 वर्षातच ते वेगळे झाले . लग्नाच्या एका वर्षानेच दोघेही वेगळे राहायला लागले होते. 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
कोण आहे सान्या सागर ?
सान्या सागर ही उत्तर प्रदेशातील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहे. तिचे वडील पवन सागर हे एक प्रसिद्ध राजकारणी आहेत. सान्या सागरने स्वतःच्या बळावर सर्व काही साध्य केले आहे. ती बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांचे जवळचे सहकारी पवन सागर यांची मुलगी आहे.
वडील मायावती सरकारमध्ये विशेष अधिकारी
तिचे वडील मायावती सरकारमध्ये विशेष अधिकारी म्हणून काम करत आहेत. सान्याने लंडन कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमधून शिक्षण पूर्ण केले आहे आणि ती एक लेखिका तसेच दिग्दर्शक देखील आहे. एवढंच नाही तर ती बऱ्याचं सीरिजमध्येही दिसली आहे. सान्या सागरने सुधीर मिश्रा यांच्या एका फिल्म्समध्ये तिसरी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
काही वर्षे एकमेकांना डेट अन् लग्न
प्रतीक आणि सान्याची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये लखनौमध्ये भव्य लग्न केलं. या लग्नात बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या.
2020 मध्ये, जेव्हा कोरोना सुरू होता, तेव्हा प्रतिक आणि सान्या वेगळे राहू लागले. दोघांनीही त्यांचे नाते सुधारण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
गोव्यातील एका गावात शांततेत जगतेय आयुष्य
घटस्फोटानंतर मात्र सान्या सागरने चित्रपटसृष्टीपासून स्वतःला दूर केले आणि आता ती गोव्यातील एका गावात शांततेत जीवन जगत आहे. तिने स्वतःला लेखन आणि कला यात व्यस्त ठेवले आहे. चित्रपट जगतापासून तिने स्वत:ला पूर्णपणे दूर ठेवलं आहे.
तसेच ती तिच्या आयुष्यातील अपडेट तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. सान्या सध्या सिंगलच असल्याचं तिच्या स्टेटसवरून तरी दिसत आहे. तर दुसरीकडे, प्रतिकने अभिनेत्री प्रिया बॅनर्जीशी लग्न करून आपला पुढचा प्रवास निवडला आहे.