प्रियांका चोप्राच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, भावूक पोस्ट समोर

Priyanka Chopra - Nick Jonas : प्रियांका चोप्राच्या कुटुंबियांनी मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन... वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... 'ती' पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी.., पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांका चोप्राच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, भावूक पोस्ट समोर
Priyanka Chopra
| Updated on: Mar 11, 2026 | 2:52 PM

Priyanka Chopra – Nick Jonas : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि हॉलिवूड सिंगर निक जोनस यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… निक याच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे. निक ज्या तरुणीला बहीण मानत होता, तिचं निधन झालं आहे. एका गंभीर आजाराने निक याच्या बहिणीचे प्राण घेतले आहे… निक याच्या बहिणीचं नाव माया किबेल असं होतं, तर माया किबेल वयाच्या 30 व्या वर्षी विल्सन नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक आजाराशी झुंजत होती. जोनास ब्रदर्सची बालपणीची मैत्रीण आणि शेजारी माया किबेल हिचं निधन झाले आहे, ज्यामुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माया हिचं निधन 7 मार्च रोजी झालं होतं. माया हिच्या निधनानंतर आई कियोको किबेल यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कियोको यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.. पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

 

 

पोस्टमध्ये मायाची आई म्हणाली, ‘मोठ्य जड अंतःकरणाने मला सांगावं लागत आहे… माया हिचं विल्सन नावाच्या एका दुर्मिळ आजाराने निधन झालं आहे. तिला होत असलेल्या तिव्र वेदना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहे… 7 मार्चच्या सकाळी माया बेशुद्ध झाली… तिचं हृदय आणि फुफ्फुसांनी काम करणे बंद केलं होतं. खूप उशीर झाला होता आणि आयसीयूमध्ये माया हिने अखेरचा श्वास घेतला.

पोस्टमध्ये पुढे लिहिल्यानुसार, ‘तिला इतक्या तिव्र वेदना होत होत्या की, ती रात्रभर रडता रडता झोपून जायची… पण आता तिला कोणत्याच वेदना होणार नाही. ती आणि तिच्या वडिलांकडे आहे…’, माया हिच्या आईच्या भावूक पोस्टवर अनेकांना कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे .

निक जोनस याने देखील व्यक्त केला शोक

कियोको अखेर म्हणाल्या, ‘फक्त 30 वर्षांसाठी मी तिची आई राहिली… मला आता तिची खूप आठवण येते… पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की, तिला आता कोणता त्रास होत नाहीये…’, माया हिच्या आईच्या पोस्टवर निक याने देखील शोक व्यक्त केला आहे.

किबेल आणि जोनास कुटुंबाचे लहानपणापासूनच जवळचे संबंध आहेत आणि ती विशेषतः निक जोनासच्या जवळची होती. असं म्हटलं जातं की, ते दोघे भाऊ आणि बहिणीसारखे एकत्र वाढले. पोस्टवर श्रद्धांजली देत निक म्हणाला, ‘माझी बहीण.. मी कायम तुझी साथ देईल..’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us