प्रसिद्ध अभिनेत्रीने निर्मात्याशी लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म, ११ महिन्यातच संपवले स्वत:चे आयुष्य

अभिनेत्रीने लग्नाच्या ११ महिन्यानंतरच स्वत:ला संपवले होते. त्यानंतर निर्मात्याला मोठा धक्का बसला होता.

प्रसिद्ध अभिनेत्रीने निर्मात्याशी लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म, ११ महिन्यातच संपवले स्वत:चे आयुष्य
Divya Bharti
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 18, 2025 | 4:10 PM

फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीच कलाकार आणि दिग्दर्शक या जोडीची जोरदार चर्चा सुरू असते. पण इंडस्ट्रीमधील काही मोजकेच निर्माते आहेत ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका निर्मात्याच्या लव्ह लाइफविषयी सांगणार आहोत. या निर्मात्याने हाऊसफुल ४, छिछोरे, सुपर ३०, बागी २, जुडवा २, हाऊसफुल ३ सारखे हिट सिनेमे दिले आहेत. कदाचित तुम्ही ओळखलं ही असेल की आम्ही कोणत्या निर्मात्याविषयी बोलत आहोत. या निर्मात्याचे नाव साजिद नाडियाडवाला असे आहे.

साजिद नाडियाडवाला हा बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय निर्माता आहे. त्याने दिव्या भारतीशी लग्न केले होते. पण लग्नाच्या दहा महिन्यांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दिव्या भारतीने स्वत:ला संपवले होते. या सगळ्यामुळे साजिदला मोठा धक्का बसला होता. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं.

कुठे झाली ओळख?

शोला और शबनम या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. हा दिव्याचा दुसरा सिनेमा होता. या चित्रपटात दिव्यासोबत गोविंदा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. साजिद गोविंदाला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर गेला होता. तेव्हा दिव्या अचानक समोर आली. दिव्याला पाहाताच साजिद प्रेमात पडला होता. त्यानंतर साजिद दररोज चित्रपटाच्या सेटवर जाऊ लागला. दिव्या आणि साजिदमध्ये चांगली मैत्री झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

दिव्याने बदलला धर्म

साजिद आणि दिव्याची लव्हस्टोरी सुरू तर झाली पण त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. दोघांचेही धर्म वेगवेगळे होते. दिव्या हिंदू होती तर साजिद मुस्लिम. दिव्याच्या करिअरला सुरुवात झाली होती तर साजिद यशस्वी निर्माता होता. पण त्याला हवी तितकी लोकप्रियता नव्हती मिळाली. १० मे १९९२ साली साजिद आणि दिव्याने लग्न केले. लग्नाच्यावेळी दिव्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तिने स्वत:चे नाव सना नाडियाडवाला असे ठेवले. त्यांचे लग्न अतिशय खासगी पद्धतीने पार पडले होते.

दिव्या आणि साजिद यांचा संसार केवळ ११ महिने टिकला. ५ एप्रिल १९९३ साली दिव्याचे निधन झाले. दिव्याच्या जाण्याने साजिदला मोठा धक्का बसला होता. दिव्याचा मृत्यू बिल्डींगमधून पडल्याने झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर साजिदने वर्धा खानशी लग्न केले. वर्धाने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की साजिद आजही दिव्याचा फोटो त्याच्या पॉकेटमध्ये ठेवतो.