AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्हीच्या ‘पार्वती’ची मोठी फसवणूक; क्षणात गमावली आयुष्यभराची पुंजी, जवळचाच माणूस निघाला गद्दार

टेलिव्हिजनवरील पार्वतीसोबत मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. अभिनेत्री पूजा बॅनर्जीने तिची आयुष्यभराची पुंजी त्यात गमावली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. यावेळी ती भावूक झाली होती.

टीव्हीच्या 'पार्वती'ची मोठी फसवणूक; क्षणात गमावली आयुष्यभराची पुंजी, जवळचाच माणूस निघाला गद्दार
पूजा बॅनर्जीImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2025 | 11:43 AM
Share

‘देवों के देव.. महादेव’ या लोकप्रिय मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जी बऱ्याच काळापासून मालिकांमध्ये झळकली नाही. छोट्या पडद्यापासून ती सध्या दूर आहे. यादरम्यान ती पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहेत. परंतु यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण सकारात्मक नाही. कारण पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल वर्मा यांच्यासोबत मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. या फसवणुकीत त्यांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी गमावली आहे. यामुळे दोघंही पूर्णपणे खचले आहेत. पूजा आणि कुणालची फसवणूक त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने केली आहे. ही वेळ आम्हा दोघांसाठी खूप कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दोघांनी याबद्दलची माहिती दिली.

या व्हिडीओमध्ये पूजा म्हणाली, “आमच्यासाठी गेले दोन-तीन महिने खूप कठीण होते. आम्हाला कळत नव्हतं की आता पुढे काय होणार? आमची आर्थिक फसवणूक झाली. त्यात आम्ही खूप मोठी रक्कम गमावली. त्यामुळे आम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागत आहे. आम्हाला हार मानायची नाहीये. या फसवणुकीत आम्ही आमच्या बचतीचे सर्व पैसे गमावले आहेत. मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला पाठिंबा द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला देवावर पूर्ण विश्वास आहे.”

View this post on Instagram

A post shared by Kunal Verma (@kunalrverma)

या घटनेचा परिणाम पती कुणालवरही खूप झाल्याचं तिने सांगितलं आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी ती चाहत्यांवर अवलंबून आहे. यादरम्यान पूजाने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची ओळख तर सांगितली नाही, परंतु तो जवळचाच मित्र होता, याचा खुलासा केला. याबद्दल सांगताना पूजा भावूक झाली होती. कुणालनेही त्याच्या मित्राबद्दल म्हटलं, “जेव्हा तुम्ही एखाद्यावर तीन वर्षांपासून विश्वास करता आणि तो प्रत्येक क्षणी तुमच्यासोहत असतो, तेव्हा ती व्यक्ती तुमच्या कुटुंबाचाही एक भाग बनते.”

पूजा आणि कुणालने पुढे म्हटलंय, “आमचा विश्वासघात झाला, आमच्यासोबत इतकी मोठी फसवणूक झाली. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. कारण आम्ही आतून खूप खचलोय. परंतु आणि हार मानणार नाही. त्यातून बाहेर पडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आमच्याकडून कधी कोणती चूक झाली असेल तर आम्ही देवाचीही माफी मागितली आहे. आम्ही खूप रडलोय. इतके दिवस आम्ही अक्षरश: वेडे झालो होतो. आता आम्हाला आणखी रडायचं नाहीये. म्हणूनच हा व्हिडीओ बनवतोय. असं म्हणतात जेव्हा तुम्ही तुमचं दु:ख इतरांसोबत शेअर करता, तेव्हा तुमचं मन हलकं होतं. जे कोणी हा व्हिडीओ पाहत आहेत, त्यांनी कृपया आम्हाला पाठिंबा द्या. आम्ही केवळ प्रामाणिकपणे आमचं काम केलंय, कधीच कोणती हेराफेरी केली नाही. त्यामुळे आमच्यासाठी हे सर्व खूप धक्कादायक आहे.” या व्हिडीओ नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत पूजा आणि कुणालला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...